टी२० ब्लास्ट स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळला जात आहे. ही स्पर्धा २५ मे ते १६ जुलै २०२२ या कालावधीत होणार आहे. लंकाशायर विरुद्ध नॉर्थहॅम्पटनशायर हा सामना १७ जुन रोजी खेळला गेला. या सामन्यात आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा दमदार खेळाडू टीम डेविड याने एक शानदार खेळी केली आहे. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवुन देऊ शकली नाही.
लंकाशायर विरुद्ध नॉर्थहॅम्पटनशायर सामन्यात लंकाशायर संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लंकाशायरची सुरुवात चांगली राहिली नाही. दोन्ही सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले मात्र त्यानंतर एसजे क्रॉफ्ट(२७ चेंडुत २३ धावा) आणि डीजे विलास (२२ चेंडुत ३८ धावा) यांनी डाव सावरला. डीजे विलासच्या बाद झाल्यानंतर टीम डेविड मैदानावर आला. त्याने या सामन्यात लंकाशायरसाठी खेळताना १४वे षटक टाकणाऱ्या फ्रेडी हेल्ड्रीचला सलग ४ चेंडुत ४ षटकार लगावले. त्याने केवळ ११ चेंडुत ३१ धावा केल्या. त्याच्या ह्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाचा व्हीडियो वायरल झाला आहे.
🍿 @timdavid8 doing @timdavid8 things.
4️⃣ in a row from the big man! 🤯
⚡️ #LightningStrikes pic.twitter.com/4eMlppROTe
— Lancashire Cricket (@lancscricket) June 17, 2022
दरम्यान, टीम डेविडच्या या छोट्या मात्र आक्रमक खेळीच्या बळावर लंकाशायरने ७ बाद १५३ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात नॉर्थहॅम्पटनशायर संघाने १६.२ षटकात ३ गडी गमावत लक्ष्याचा पाठलाग केला. लंकाशायर संघ ९ सामन्यात ६ सामने जिंकत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर नॉर्थहॅम्पटनशायर ७ गुणांसह सातव्या स्थानी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिकचं पुनरागमन ‘या’ खेळाडूंसाठी ठरणार धोक्याची घंटा
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा कसोटी क्रिकेटला रामराम!, अचानकच केली निवृत्तीची घोषणा
पंतच्या शोधात ‘या’ खेळाडूंकडे झाले दुर्लक्ष, सोशल मीडियावरील युझर्सच्या तिखटं प्रतिक्रिया एकदा बघाच