इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (IPL) (आयपीएल) सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनसाठी जगभरातील १२०० पेक्षा अधिक खेळाडूंनी नाव नोंदवले होते. त्यानंतर ५९० खेळाडूंची अंतिम यादी देखील घोषित झाली आहे. तर १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी नाव नोंदणी होताच एक फलंदाज पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत गोलंदाजांवर तुटून पडला आहे. कोण आहे तो फलंदाज? चला जाणून घेऊया.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मुलतान सुलतान (Multan Sultan) आणि इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मुलतान सुलतानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी बाद २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इस्लामाबाद युनायटेड संघाकडून शादाब खानने चांगली फलंदाजी केली. परंतु इस्लामाबाद युनायटेड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना मुलतान सुलतान संघाने २० धावांनी आपल्या नावावर केला.
या सामना दोन संघांमध्ये नव्हे तर दोन खेळाडूंमध्ये सुरू असल्या सारखे वाटत होते. मुलतान सुलतान संघाकडून टीम डेविडने (Tim David) तुफान फटकेबाजी केली. तर इस्लामाबाद संघाकडून कर्णधार शादाब खानने (Shadab Khan) धावांचा पाऊस पाडला. टीम डेविडची खेळी पाहून असे वाटत होते की, तो आयपीएल स्पर्धेसाठी नाव नोंदणी झाल्याच्या जल्लोष साजरा करतोय.
टीम डेविडची तुफानी खेळी
टीम डेविडने या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले होते. तसेच चौथ्या गड्यासाठी त्याने रिली रुसोसोबत मिळून शतकी भागीदारी केली होती.
शादाब खानची खेळी गेली व्यर्थ
टीम डेविडच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुलतान सुलतान संघाने २१७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेड संघाकडून शादाब खानने अवघ्या ४२ चेंडुंमध्ये ९१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ षटकार मारले होते. परंतु इस्लामाबाद युनायटेड संघाला या सामन्यात २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
U19 क्रिकेट विश्वचषक: अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले; २४ वर्षांनंतर इंग्लंड अंतिम फेरीत
मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ दहा मार्की खेळाडूंसाठी दिसणार ऍक्शन!
सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’