बुधवारी (24 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या डावातील 17व्या षटकात टिम डेविड याने विकेट गमावली. डेविडने विकेट गमावलेला चेंडू फुलटॉस असून यावर नो बॉलचा वाद होताना दिसत आहे. स्वतः डेविडनेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या. मुंबईच्या डावातील 17व्या षटकात यश ठाकुर गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसरा चेंडू यश ठाकूरने फुलटॉस टाकला आणि टिम डेविड (Tim David) यावर दीपक हुड्डाच्या हातात झेल देऊन बसला. डेविडच्या मते हा चेंडू कंबरेच्या वरती होता आणि पंचांना त्याला नाबाद दिले पाहिजे. मात्र, पंचांना डेविडला बाद दिले. पंचांच्या मते डेविड गुडघ्यात वाकल्यामुळे हा चेंडू नो बॉल देता येणार नाही. आपण बाद असल्याचे कळताच डेविडने मैदानातच निराशा व्यक्त केली.
Yash Thakur with the big breakthrough! 🙌
The dangerous Tim David departs for 13.
Mumbai Indians 158/5 with less than 3 overs to go
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1wG31#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/slSvqWl2ge
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
डेविडच्या विकेटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सोबतच पंचांनी बाद दिल्यानंतर त्याने दिलेली रिएक्शन देखील व्हायरल होत आहे. डेविडने या सामन्यात 13 चेंडूत 13 धावा केल्या. डेविडने विकेट गमावली तेव्हा मुंबईची धावसंख्या 148 होती. मुंबईसाठी या सामन्यात सर्वोत्तम खेळी कॅमरून ग्रीनने केली. ग्रीनच्या बॅटमधून 23 चेंडूत 41 धावा आल्या. सूर्यकुमार यादव याने 20 चेंडूत 33 धावा केल्या. मुंबईचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक या सामन्यातही मैफिल लुटताना दिसला. नवीनने टाकलेल्या 4 षटकांमध्ये 38 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्सही घेतल्या. त्यापाठोपाठ लखनऊसाठी दुसरा यशस्वी गोलंदाज ठरला यश दयाल. दयालने 4 षटकात 34 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. मोहसिन खानला एक विकेट मिळाली. (Tim David unhappy with the decision of the umpires)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सामन्याने मोडले व्ह्युअरशिपचे सगळेच रेकॉर्ड, 2019च्या वर्ल्डकप विक्रमाचीही केली बरोबरी
सीएसकेच्या सीईओंना काढावी लागली जडेजाची समजूत! गुजरातविरुद्ध जिंकूनही अष्टपैलू नाराज?