भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे दुसरा कसोटी सामना शनिवारपासून (26 डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्व गडी गमावून फक्त 195 धावसंख्या उभारली. मात्र, या सामन्याच्या पहिल्या डावात अशी एक घटना घडली, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या डावात टीव्ही पंचाने एक चुकीचा निर्णय दिला होता. त्यावर बर्याच माजी खेळाडूंनी टीका केली आहे.
वसीम जाफर यांनी मारला टोमणा
यामध्ये आता वसीम जाफरने या निर्णयाला सोशल मिडियावरून टोमणा मारला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन हा धावबाद झाला होता. मात्र, टीव्ही पंचाने पुन्हा पुन्हा रिप्ले पाहून टीम पेनला नाबाद घोषित केले. परंतु या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, टीम पेन धावबाद आहे. त्यामुळे जाफरने ट्विटरच्या माध्यमातून पंचाच्या या निर्णयाला टोमणा मारला. जाफरने आपल्या मजेदार शैलीत एक मिम्स शेअर या निर्णयाची खिल्ली उडवली.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1342694580710301697?s=19
टीम असा झाला होता धावबाद
सामन्याच्या पहिल्या डावात 55 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमरॉन ग्रीन हा फटका मारून धावेसाठी धावला होता. ग्रीनने पहिल्यांदा नकार दिला, आणि नंतर धाव घेण्यासाठी पुढे गेला. त्यांनंतर नॉन स्ट्राईक एन्डला उभा असलेला टीम पेन सुद्धा धावला. तेव्हा चेंडू यष्टीरक्षक पंतकडे चेंडू पोहचला. त्याने वेळ वाया न घालवता यष्टी उडवल्या. त्यामुळे टीव्ही रिप्ले मध्ये स्पष्ट दिसत होते की टीम पेनची बॅट रेषेवर होती. त्यामुळे नियमानुसार, जर कोणत्या फलंदाजाची बॅट रेषेवर असेल आणि तर तो बाद असतो.
पंचाने टीम पेनला ठरवले नाबाद
टीव्ही पंचाने पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून टीम पेनला नाबाद घोषित केले. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या निर्णयाचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला आहे. यावर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न यानेसुद्धा ट्विटरवरुन या निर्णयाला चुकीचे आहे असे मान्य केले आणि हा निर्णय देण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
https://twitter.com/cricketcomau/status/1342696037979340800?s=19
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद 195
परंतु त्यानंतर ही ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन 13 धावावर बाद झाला. त्याचा झेल हनुमा विहारीने अश्विनच्या गोलंदाजीवर घेतला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक जास्त धावा काढताना 132 चेंडूत 48 धावांची खेळी केली. त्याचबरोबर मॅथ्यू वेड 30 (39), हेड 30 (92) यांनी धावांचे योगदान दिले. या डावात पुन्हा एकदा स्टार फलंदाज अपयशी ठरला. त्याला आपले खाते सुद्धाउघडता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ 72.3 षटकात 195 धावावर ढेपाळला.
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! पदार्पणवीर सिराजचे हनुमा विहारीने वाढवले मनोबल; ‘हे’ होते कारण
‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे भारतीय खेळाडू, ही आहेत नावे






