न्यूझीलंड क्रिकेट सध्या अतिशय वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात त्यांची कामगिरी उत्कृष्ट झाली होती. मात्र, त्याचवेळी संघाचे अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू संघाची साथ सोडून लीग क्रिकेटकडे वळताना दिसत आहेत. ट्रेंट बोल्ट, मार्टिन गप्टिल व जिमी निशाम यांच्यानंतर आणखी एका बड्या क्रिकेटपटूने संघाची साथ सोडण्याचे संकेत दिलेत.
काही महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडने आपल्या नव्या केंद्रीय करारांची घोषणा केली होती. यामध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट व अष्टपैलू जिमी निशाम यांना जागा मिळाली नव्हती. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा इतर लीग खेळण्यास प्राधान्य दिले होते. अशा स्थितीतही त्यांचा विश्वचषक संघात समावेश केला गेलेला. तर विश्वचषकानंतर संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिल याला देखील याच कारणाने बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. त्याचवेळी आता संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने देखील महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्य सामन्यापूर्वी बोलतात तो म्हणाला,
“मागील काही महिन्यात क्रिकेट खूप बदलले आहे. माझा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी करार आहे. त्याचवेळी मी आयपीएल देखील खेळताना दिसेल. पुढे काय होते हे पहावे लागेल. मात्र दोन-तीन वर्षाच्या तुलनेत आता क्रिकेट पुढे गेलेले आहे.”
इतर खेळाडू प्रमाणे तू देखील असा विचार करत आहे का या प्रश्नावर बोलताना साऊदी म्हणाला,
“मी फार पुढचा विचार करत नाही. सध्या तरी मला देशासाठी तीनही प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे. मात्र, याबद्दल त्या वातावरणात प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल.”
साऊदी आयपीएलच्या पुढील हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना दिसेल. त्याचवेळी सध्या सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघ आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा त्यांचा विचार असेल.
(Tim Southee Big Statement On Central Contract And International Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’