---Advertisement---

लॉर्डसवरील कामगिरीने टीम साउदीला फायदा, इशांत शर्माला पछाडत ‘या’ यादीत केली आगेकूच

On: रविवार, जून 6, 2021 8:04 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्याच्या दुसर्‍या डावात न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या डावात इंग्लंडची मधली फळी कापून काढतांना अवघ्या ४३ धावांत ६ बळी घेण्याची किमया केली. त्याच्या या कामगिरीने इंग्लंडचा डाव २७५ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात १०३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.

साउदीच्या कामगिरीने संघाला तर फायदा झालाच. मात्र याशिवाय त्याने काही महत्वाचे वैयक्तिक विक्रम देखील आपल्या नावे केले. ३० वर्षीय साउदीने आपल्या कामगिरीने भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मागे टाकले. तसेच न्यूझीलंडचे माजी दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली यांचा विक्रम देखील मोडला.

इशांत शर्माला टाकले मागे
टीम साउदीचा हा कसोटी क्रिकेटमधील ७८वा सामना होता. त्याने यात आत्तापर्यंत ३०८ बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस कसोटीत पहिल्या डावात त्याने ६ बळी घेतांना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मागे टाकले. इशांतच्या नावे १०१ कसोटी सामन्यात ३०३ बळी आहेत. याचवेळी साउदीने ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज फ्रेडी ट्रूमन यांनाही मागे टाकले. ट्रूमन यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३०७ बळी आहेत.

रिचर्ड हॅडली यांचा विक्रम मोडला
यावेळी टीम साउदीने रिचर्ड हॅडली यांचा विक्रम देखील मोडीत काढला. रिचर्ड हॅडली यांनी न्यूझीलंडकडून २०१ आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण ५८९ बळी घेतले आहेत. साउदीच्या नावे आता ३०३ आंतरराष्ट्रीय सामन्यात ५९१ बळी आहेत. या यादीत न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी आघाडीवर आहे. त्याच्या नावे ४४२ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७०५ बळी आहेत. साउदीने यावेळी न्यूझीलंडकडून खेळतांना कसोटी क्रिकेटमधली ३०० बळींचा टप्पा देखील ओलांडला. या यादीत देखील रिचर्ड हॅडली (४३१ बळी) आणि डॅनियल व्हेटोरी (३६२ बळी) त्याच्या पुढे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अरे बड्डे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा, अजिंक्य रहाणेला शुभेच्छा देताना दिल्ली कॅपिटल्सचा मराठी तडका

बांग्लादेशमधील सामन्यात बायो बबलचे उल्लंघन, दिग्गज खेळाडूचे नाव आले समोर

व्वा रं पठ्ठ्या! ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---