सध्या यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असून युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउदी याने मोठे वक्तव्य केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूरमध्ये पार पडणार आहे, तर दुसरा कसोटी सामना ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईमध्ये पार पडणार आहे. तसेच कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी १७, १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी टी२० मालिका पार पडणार आहे.
या मालिकेबाबत बोलताना टीम साऊदी म्हणाला की, “भारताविरुद्ध भारतात खेळून खूप दिवस झाले. ते त्या परिस्थितीत एक मजबूत संघ आहे. आम्हाला अशा परिस्थितीची सवय नाही, म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असणार आहे.”
या दौऱ्यावर न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना विश्रांती दिली जाणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. ज्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता हे दोन्ही संघ कसोटीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. ही कसोटी मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२०२३ स्पर्धेचा भाग आहे.
याबाबत बोलताना टीम साउदी म्हणाला की, “या दौऱ्यापासून एक नवीन चाचणी चक्र सुरू होते. नवे हंगाम रोमांचक असणार आहे. दौऱ्यावर जाण्याची आणि अतिशय चांगल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खडतर परिस्थितीत स्वतःची चाचणी घेण्याची ही उत्तम संधी असेल. मागील हंगामाचा भाग बनणे चांगले होते. परंतु, आम्ही पुन्हा चांगली सुरुवात करून पुढील दोन वर्षात चांगली कामगिरी करण्याचा विचार करत आहोत.”
तसेच न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने म्हटले की, “भारताविरुद्ध भारतात खेळणे हे आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या स्वरूपात स्वतःला आव्हान देत असतात. ”
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर
भारत-स्कॉटलंड सामन्यादरम्यान कसे असेल दुबईचे हवामान? घ्या जाणून
दीपक चाहरची बहीण करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण, ‘या’ तमिळ चित्रपटात झळकणार