वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे हे सहावे वनडे विश्वविजेतेपद ठरले. भारतीय चाहते या पराभवामुळे चांगलेच निराश आहेत. मात्र, भारताकडे अवघ्या 72 तासांमध्ये या पराभवातून सावरण्याची संधी असेल.
वनडे विश्वचषकाच्या समाप्तीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा एकमेका विरोधात मैदानात उभे ठाकणार आहेत. उभय संघांमध्ये 23 नोव्हेंबर पासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.
या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र, या संघात विश्वचषकातील केवळ सूर्यकुमार यादव, ईशान किशन व प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. विश्वचषकात खेळलेले इतर खेळाडू यादरम्यान विश्रांती घेतील. या मालिकेसाठी भारतीय संघात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा व जितेश शर्मा यांना संधी मिळू शकते. तर गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल हा संघात पुनरागमन करू शकतो. वेगवान गोलंदाजीत आवेश खान, अर्शदीप सिंग यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची यापूर्वीच घोषणा झाली असून, अनुभवी मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करेल. हे सर्व सामने स्पोर्ट 18 व जिओ सिनेमा येथे पाहता येतील. सर्व सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरू होतील.
भारत वि ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक:
पहिला टी20 विशाखापट्टणम ( 23 नोव्हेंबर)
दुसरा टी20 तिरूअनंतपुरम (26 नोव्हेंबर)
तिसरा टी20 गुवाहाटी (28 नोव्हेंबर)
चौथा टी20 नागपूर (1 डिसेंबर)
पाचवा टी20 हैदराबाद (3 डिसेंबर)
(Time Table Of India v Australia T20 Series)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून…
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर