पुढील महिन्यात इंग्लंडचा भारत दौरा सुरु होणार आहे. इंग्लंड भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. त्यातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. या दोन्ही सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. आता याबद्दल तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने महत्त्वाची माहिती दिली आहे.
तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही सामने बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आरएस रामासामी म्हणाले, कोविड-१९ चा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले, ‘सध्या कोविड -१९ च्या साथीच्या रोगाचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खेळाडू, अधिकार्यांनाही कडक क्वारंटाईन नियमांचे पालन करावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्यांना अनेक कोविड-१९ च्या तपासण्यांनाही सामोरे जावे लागणार आहे. तसेच बीसीसीआयच्या मार्गदर्शन तत्वानुसार ५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान चेन्नईत होणारे २ कसोटी सामने बंद दाराआड होणार आहे.’ त्याचबरोबर त्यांनी सांगितले की या सामन्यांसाठी कोणत्याही प्रकारची तिकीटविक्री होणार नाही.
इंग्लंडविरुद्ध पहिला सामना ५ ते ९ फेब्रुवारी आणि दुसरा सामना १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान चेन्नईमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढील उर्वरित २ सामने अहमदाबाद येथे होणार आहेत.
कसोटी मालिकेनंतर ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. तसेच ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यात होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर! वेस्ट इंडिजविरुद्ध शाकिब अल हसनचा ‘हा’ मोठा विक्रम, ठरला वनडेतील एकमेव खेळाडू
हॉटेलच्या खोलीत महिला अधिकारीसोबत सापडला युवा क्रिकेटर?, श्रीलंकाच्या माध्यमांचे आरोप