खराब फॉर्ममुळे मुरली विजय आयपीएलच्या मागील २ हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. गेल्या ५ हंगामात त्याला फक्त ६ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज या चॅम्पियन संघाचा भाग असला तरी. या ३८ वर्षीय सलामीवीर फलंदाजाने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या सामन्यात शतक झळकावले. यादरम्यान त्याने १२ षटकार आणि ७ चौकार मारले. म्हणजेच अवघ्या १९ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीवर पत्नी निकिताचा आंनद पाहण्यासारखा आहे.
मुरली विजय (Murali Vijay) याची ही धमाकेदार खेळी पाहुन त्याची पत्नी निकिता मात्र भलतीच खूष झाली हे. यावेळी तिने एक नाही तर तब्बल ९ स्टोरी सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. तिने शेयर केलेल्या स्टोरी सध्या चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.
मुरली विजयची पत्नी निकिता ही नेहमी चर्चेत राहिली आहे. ती भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पहिली पत्नी आहे. मुरलीसोबतचे तिचे अफेयर कार्तिकला कळल्याने त्याने तिला घटस्फोट दिला. सध्या ती विजयच्या खेळीचा आनंद घेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर त्या ९ स्टोरी शेयर केल्या आहेत. त्या तुफान व्हायरल झाल्या असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

रुबी त्रिची वॉरियर्सच्या संघाकडून खेळताना मुरली विजयने केलेल्या शतकानेही त्याचा संघ पराभूत झाला आहे. नेल्लई रॉयल्स किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात झंझावाती फलंदाजी करत २३७ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुरली विजयने १२१ धावा केल्या. मात्र वॉरियर्स संघातील त्याच्या व्यतिरिक्त कोणीच खेळपट्टीवर टिकले नाही.
एकीकडून विकेट्स जात असताना मुरली विजय खंबीर राहिला. त्याने ५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटी ६६ चेंडूत १२१ धावा करून तो बाद झाला. संघाला निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १७० धावा करता आल्या. मुरली विजयशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. त्याने संघाच्या अर्ध्याहून अधिक धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला
‘काय होईल जर मी पडलो? पण…’ आऊट ऑफ फॉर्म विराटचा इंस्टाग्राम पोस्टद्वारे टिकाकारांवर निशाणा





