भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. असाच अनुभव ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना आला होता.
ते म्हणाले की, २०१८-१९मध्ये भारत दौऱ्यावर असताना विराटचा (Virat Kohli) आक्रमकपणा पाहून त्यांना ‘पंचिंग बॅग’ प्रमाणे वाटले. यावेळी लॅंगर (Justin Langer) यांनी क्रिकेटमधील गैरवर्तणुकीबाबत आयसीसीच्या दुतोंडी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
२०१८-१९ मध्ये विराटच्या नेतृत्वात भारतीय सघांने ऑस्ट्रेलिया संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) २-१ने पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत भारतीय संघाचा हा पहिलाच विजय होता. यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकाही २-१ने जिंकली. तर टी२० मालिकेत १-१ने बरोबरी झाली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील अमेझॉन प्राईमवर रिलीझ झालेली डॉक्यूमेंट्री-सीरिज ‘द टेस्ट’मध्ये (The Test) लँगर म्हणाले की, “मला आठवते की, जेव्हा मला पंचिंग बॅगप्रमाणे वाटले होते. तेव्हा असे वाटले की आमचे हात पाठीमागून बांधलेले आहेत.”
लँगर यांनी आपल्या खेळाडूंना विराटचा सामना करण्यास सांगितले होते. परंतु त्याच वेळी हे देखील सांगण्यात आले की गैरवर्तणुकीमध्ये सीमा ओलांडू नका.
लँगर म्हणाले की, “गैरवर्तणुक करणे आणि अपशब्द वापरणे यात फरक आहे. खेळात गैरवर्तन करण्यास जागा नाही. आम्हाला त्याच्याशी (कोहली) गैरवर्तन करायचे नव्हते.”
यादरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनमध्ये वाद झाला होता. यावेळी पेन म्हणाला की, “मला असे वाटले की आता हे खूप जास्त होत आहे. याच कारणामुळे मी त्याला प्रत्युत्तर दिले.
ट्रेंडिंग घडोमोडी-
-बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार
–इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट