टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच भारत आणि अमेरिका संघामध्ये सामना होणार आहे. यजमान अमेरिका टीम इंडिया आज (12 जून) पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. भारतीय संघासह अमेरिकेने पण स्पर्धेत सलग दोन सामने जिंकले आहेत. तर हा सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. अमेरिकेने पहिल्यांदाच विश्वचषकात प्रवेश करुन आपल्या खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव केला आणि नंतर सुपर ओव्हर मध्ये पाकिस्तानचा पराभव केला.
अमेरिकन संघाबाबत आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे संघातील 8 खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. यामध्ये कर्णधार मोनांक पटेल, हरमीत सिंग, जसप्रीत सिंग, नॉस्तुश केंजिगे, नितीश कुमार, मिलिंद कुमार, सौरभ नेत्रावळकर आणि निसर्ग पटेल यांचा समावेश आहे. अली खान आणि शायान जहांगीर हे पाकिस्तानी वंशाचे दोन खेळाडूही आहेत.
साखळी फेरीत टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्वाचा मानला जात आहे. भारताने हा सामना जिंकल्यास सुपर-8 साठी पात्र ठरणार आहे. हेच समीकरण अमेरिकन संघासाठी पण आहे. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडला 8 विकेट्सनी धूळ चारली तर पाकिस्तानविरुद्ध आटीतटीच्या सामन्यात इंडियाने 4 धावांनी शानदार विजय मिळवाला होता. यादरम्यान पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धक्का देत अमेरिकेने टी20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. तर पहिल्या सामन्यात अमेरिकेने कॅनडाला पराभव केले होते.
टीम इंडिया अमेरिकन संघास हलक्यात घेण्याची चूक कदापी करणार नाही. कारण अमेरिकन संघातही मॅच विनर खेळाडू आहेत. ज्यामुळे दोघांमधील हा सामना बरोबरीचा मानला जात आहे. साैरभ नेत्रावळकर, कर्णधार मोनांक पटेल, ऑरन जोन्स, कोरी अँडरसन हे चारही खेळाडू चांगल्या फाॅर्म मध्ये असल्याने, टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरु शकतात. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना अतिरिक्त कामगिरी करावी लागणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
किंग कोहलीला टी20 मध्ये 14 वर्षे पूर्ण जाणून घ्या, विराटची बहुमोल कामगिरी!
आजच होणार पाकिस्तानचा पत्ता कट! अमेरिका पोहचणार सुपर 8 मध्ये, पण कसं? ते जाणून घ्या