---Advertisement---

वॉर्नर, स्मिथ आणि ब्रॅडमन… जुळून आलाय हा विलक्षण योगायोग!!

---Advertisement---

ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 3 बाद 589 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात आज एक खास योगायोग घडला आहे.

आज ऑस्ट्रेलियाकडून या डावात आज(30 नोव्हेंबर) डेव्हिड वॉर्नरने नाबाद त्रिशतक झळकावले आहे. त्याने 418 चेंडूत नाबाद 335 धावा करताना 39 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

त्याने ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलर यांच्या 334 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्ध 1930 ला 334 धावांची खेळी केली होती. तर टेलर यांनी पाकिस्तान विरुद्ध 1998 ला नाबाद 334 धावांची खेळी केली होती.

तसेच आज स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करताना त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी कसोटीमध्ये 6996 धावा केल्या आहेत.

स्मिथ आता 126 कसोटी डावातील 7013 धावांसह या यादीत ब्रॅडमन यांना मागे टाकत 11 व्या क्रमांकावर आला आहे.

त्यामुळे आज वॉर्नर आणि स्मिथ या दोघांनीही ब्रॉडमन यांच्या दोन वेगवेगळ्या विक्रमांना मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 91 वर्षांपूर्वी 30 नोव्हेंबर 1928 ला ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---