टोकियो ऑलिम्पिक २०२० आता त्याच्या शेवटच्या चरणात आहे. अनेक देशातील खेळाडूंनी आपल्या देशासाठी पदके मिळवून दिली आहेत. तर काहींनी आपल्या खेळाच्या कौशल्याने प्रेक्षकांचे आणि क्रिडा रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर या ऑलिम्पिकमध्ये असेही काही किस्से घडले जे नेहमी लोकांच्या लक्षात राहतील. त्यातीलच एक म्हणजे ग्रेट ब्रिटनचा सिंक्रनाईज्ड डाईवर टॉम डेलीचा.
टॉमचा प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विनतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. टॉमने २६ जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये १० मीटरच्या सिंक्रेनाइज्ड स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते.
टॉमने सुवर्णपदक जिंकल्यानंतरही तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला. कारण, टॉम प्रेक्षकांमध्ये बसून चक्क स्वेटर विणत होता. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत टॉम म्हणाला,”मी हा स्वेटर माझ्या मित्राच्या ‘फ्रेंच बुलडॉग’साठी विणत आहे”. तसेच बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील टॉमचा हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला होता.
दरम्यान, गुरुवारी (५ ऑगस्टला) टॉमने स्वेटर विणून पूर्ण केले. तेव्हा सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत म्हणाला, “जेव्हा मी टोकिओ ऑलिंपिकसाठी आलो होतो. तेव्हा मला असे काहीतरी करायचे होते, जे मला नेहमी या ऑलिंपिकची आठवण देत राहील. त्यामुळे मी हा स्वेटर विणला. त्याचबरोबर मी यात वेगवेगळ्या प्रकारात रंगकाम केले, तसेच स्वेटरच्या मागे क्लासिक ग्रेट ब्रिटनचे मानचिन्ह काढले आहे व खांद्यावर झेंडा काढून त्यावर जीआर (ग्रेट ब्रिटेन) लिहिले आहे”.
https://www.instagram.com/p/CSL0_WOrlWL/
त्याचबरोबर तो पुढे म्हणाला, “स्वेटरच्या पुढच्या बाजूला मला साधेच परंतु, चांगले काहीतरी करायचे होते. म्हणून, मी जपानी भाषेत ‘टोकियो’ लिहिण्याचा प्रयत्न केला. तसेच मी माझा ताण कमी करण्यासाठी नेहमीच स्वेटर विणतो” असेही तो म्हणाला.
टॉमचे अनेक चाहते आहेत तसेच त्याच्या सोशल मीडियावर देखील त्याचे खूप चाहते आहेत. यावर तो म्हणाला यावरून मी पैसे गोळा करून वडिलांच्या आठवणीत ब्रेन ट्युमरशी संबंधित एका चॅरिटीला दान देणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–महिला हॉकीपटूंचे कौतुक! ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीबद्दल हरियाणा सरकारकडून इतक्या रुपयांचे बक्षीस जाहीर
–“माझे नाव जर्सीवरून गायब होत असले, तरी मी हार मानणार नाही”
–दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला ‘जड्डू’, १५ वी धाव घेत केला मोठा पराक्रम