ADVERTISEMENT

दुर्दैव! टेनिस एकेरी सामन्यात सुमित नागल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत; ऑलिंपिकमधून बाहेर


भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिंपिक २०२० मधील टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये निराश केले. त्याला या राऊंडमध्ये डॅनिल मेदवेदेवकडून पराभूत व्हावे लागले. यासोबतच टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेता मेदवेदेवने नागलला एरियाके टेनिस कोर्ट नंबर १वर ६-२, ६-१ ने पराभूत केले. हा सामना एकूण १ तास ६ मिनिटे चालला.

यापूर्वी नागलने पहिल्या राऊंडमध्ये आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेत्या उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला ३ सेटमध्ये पराभूत केले होते. (Tokyo Olympic 2020 Sumit Nagal of Ruled of The Olympics After Defeat Against Daniil Medvedev)

अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने नागलला टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळाला होता.

यापूर्वी झीशान अलीने सियोल ऑलिंपिक १९८८ च्या टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत पराग्वेच्या व्हिक्टो काबालेरोला पराभूत केले होते. त्यानंतर लिएंडर पेसने ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीला धूळ चारत अटलांटा ऑलिंपिक १९९६ मध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.

पेसनंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या टेनिस एकेरी स्पर्धेत कोणालाही विजय मिळवता आला नव्हता. सोमदेव देववर्मन आणि विष्णू वर्धन लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये पहिल्या राऊंडमध्येच पराभूत झाले होते.

यापूर्वी महिला मिश्र गटात अनुभवी सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाच्या जोडीला पहिल्या राऊंडमध्येच ल्युडमीला विक्टरिवना किचेनोक आणि नाडिया विक्टरिवना किचेनोक या युक्रेनच्या जुळ्या बहिणींच्या जोडीने ०-६, ७-६, १०-८ ने पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला होता.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-तिरंदाजीमधून आनंदाची बातमी! भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ


Related Posts

Next Post
ADVERTISEMENT