टोकियो ऑलिंपिकमध्ये जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. यादरम्यान जर्मनीच्या महिला खेळाडूंनी असे काही केले आहे, चोहो बाजूंनी त्यांचीच चर्चा होत आहे. जर्मन महिला खेळाडूंनी खेळामार्फत ‘फ्रीडम ऑफ चॉईस’ म्हणजेच आपल्या आवडीचे कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी (२५ जुलै) झालेल्या सामन्यात जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टिक्स फुल बॉडी सूटमध्ये दिसल्या. त्यांनी आपल्या कपड्यांबद्दल बोलताना म्हटले होते की, त्यांनी हे कपडे आवडीच्या स्वातंत्र्यास चालना देण्यासाठी आणि स्त्रियांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले आहेत. जेणेकरून महिला खेळाडूंना यात आरामदायक वाटेल. (Tokyo Olympics 2020 Germans Gymnastics Full Body Suits Freedom of Choice)
German Olympic Gymnasts fight against sexualization of women by wearing unitards for the first time. #Olympics #gymnastics #Germany pic.twitter.com/bheo9w7RCl
— Jay Lim (@aQuoteAday) July 25, 2021
जर्मन संघाच्या खेळाडू सारा वॉस, पॉलिन शेफर- बेट्झ, एलिझाबेथ सेट्ज आणि किम बुई यांनी लाल तसेच पांढऱ्या रंगाचे यूनिटार्ड परिधान करून मैदानावर उतरल्या होत्या. हे लियोटार्ड आणि लेगिंग्सला एकत्र करून बनवले होते. हा ड्रेस पूर्ण पाय झाकत होता.
या खेळाडूंनी आपल्या सरावादरम्यानही असेच कपडे परिधान केले होते. खेळाडूंनी त्यावेळी दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, ते अंतिम स्पर्धेतही ‘फ्रीडम ऑफ चॉईस’ला प्रोत्साहन देण्यासाठी असेच कपडे परिधान करतील.
सारा वॉसने जपान टाइम्सशी बोलताना सांगितले की, त्यांच्या टीमने अंतिम यूनिटार्डपूर्वी यावर चर्चाही केली होती. २१ वर्षीय वॉस म्हणाली की, “तुम्ही महिला म्हणून जेव्हा मोठ्या होत असता, तेव्हा आपल्या शरीरासह जुळवून घेणे फार कठीण होऊन बसते. आम्ही हे निश्चित करू इच्छितो की, शॉर्ट यूनिटार्ड असो किंवा लाँग आम्ही जे काही परिधान करू, त्यामध्ये आम्हाला चांगले दिसण्यासोबतच त्यात आरामदायी वाटले पाहिजे.”
https://www.instagram.com/p/CRwmYXvMsGi/?utm_source=ig_web_copy_link
वॉसने असेही म्हटले की, “माझ्या संघाने एप्रिल महिन्यात युरोपीय चॅम्पियन्समध्येही फुल बॉडी सूट परिधान केले होते. खेळामध्ये लैंगिकतेला प्रोत्साहन देणे हा त्याचा हेतू नाही. आम्हाला रोल मॉडेल बनण्याची इच्छा होती. जेणेकरुन लोकांना आमचे अनुसरण करण्याची हिंमत येईल.” जर्मन खेळाडूंच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
खरं तर स्पर्धांमध्ये महिला जिम्नॅस्टिक्सला फुल किंवा हाफ बाहू असणारे पारंपारिक लियोटार्ड घालावे लागते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाय झाकणारे कपडे घालण्याची परवानगी आहे, परंतु तरीही महिला खेळाडूंनी धार्मिक कारणांसाठीच याचा वापर केला. पहिल्यांदाच महिला खेळाडूंनी ‘फ्रीडम ऑफ चॉईस’ अंतर्गत असे कपडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही वर्षांमध्ये स्पर्धांमध्ये लैंगिक आणि शारीरिक शोषणाचे अनेक प्रकरणांनी महिला खेळाडूंच्या चिंतेत वाढ केली आहे. आता ऍथलिट्सच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन सेफ्टी प्रोटोकॉलही बनवले जात आहेत.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?