---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक: भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी तिसऱ्या राऊंडनंतर पोहोचला ‘या’ स्थानी

On: शनिवार, जुलै 31, 2021 7:35 PM
---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी (२९ जुलै) पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेतील राऊंड ३ पार पडला. या ऑलिंपिकमध्ये भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी शानदार प्रदर्शन करत होता. मात्र, राऊंड ३ मधील प्रदर्शनानंतर अनिर्बन गुणतालिकेत चांगली स्थितीत पोहोचण्यात अपयशी ठरला.

भारतीय गोल्फर अनिर्बन ६ अंडर २०७ (६७, ७२, ६८)च्या एकूण स्कोरसोबत २८ व्या क्रमांकावर राहिला. दुसरीकडे भारताचाच उदयन माने २ ओव्हर २१५ (७६, ६९, ७०)चा स्कोर करत एक स्थान वर सरकत ५५ वे स्थान मिळवले. (Tokyo Olympics 2020 Golf Men India Anirban Lahiri Udayan Mane Day 3 Result )

याव्यतिरिक्त अमेरिकेच्या झेंडर शॉफेल तीन अंडर ६८ च्या स्कोरसह आपले अव्वल स्थान मजबूत करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचा एकूण स्कोर १४ अंडर ११९ (६८, ६३, ६८) असा होता.

स्थानिक गोल्फर आणि जपानचा सध्याचा चॅम्पियन हिडेकी मत्सुयामा १३ अंडर २०० च्या एकूण स्कोरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये अनिर्बनने आपल्या दिवसाची सुरुवात १७ व्या ग्रीन कोर्सवर केली. शुक्रवारी खराब वातावरणाने त्याचे प्रदर्शन रोखले होते. तिथे त्याला आपला सामना रोखण्यापूर्वी आपल्या पार- चारच्या होलवर एक बोगी केला होता.

मात्र, अनुभवी गोल्फर लहिरी तिसऱ्या दौऱ्यात आपल्या पाचव्या ग्रीन कोर्टवर एक बर्डी करण्यास चुकला.

तरीही आजच्या तिसऱ्या राऊंडच्या प्रदर्शनामध्ये तो ११ व्या होलवर एक बोगी, यानंतर १६ व्या आणि १७ व्या होलवर अनुक्रमे एक बर्डी आणि एक ईगल करत ३ अंडर ६८ चा स्कोर करताना दिसला.

दुसरीकडे, उदयन मानेने संमिश्र प्रदर्शन केले. कारण, शनिवारी (३१ जुलै) तो ४ बर्डी आणि ३ बोगीसह आपल्या ऑलिंपिक पदार्पणात थोडे का होईना पुढे जाण्यात यशस्वी झाला.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक

-भारताच्या आशा धूळीत! अव्वल बॉक्सर अमित पंघलला रिओ ऑलिंपिक विजेत्या मार्टिनेझने दिली ऑलिंपिक पदार्पणात मात

-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---