शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारताने आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूल ए सामन्यात ४-३ ने पराभूत केले. तसेच भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. यासह वंदनाने एक विक्रमही आपल्या नावावर केला. ती ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
भारताच्या या विजयाची शिल्पकार पूर्णपणे वंदना ठरली. मात्र, तिला इथपर्यंत पोहोचणे वाटते तितके सोपे नव्हते. टोकियो ऑलिंपिकच्या तयारीमुळे ती आपल्या वडिलांना देखील शेवटची पाहू शकली नव्हती. त्यामुळे आता तिला पदक जिंकून आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहायची आहे.
३ महिन्यांपूर्वी वंदनाच्या वडिलांना झाले होते निधन
वंदनाचे वडील नाहर सिंग कटारिया कुस्तीपटू होते. ३ महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. त्यावेळी ट्रेनिंगमुळे वंदना आपल्या वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती.
History has been made. 🇮🇳
Vandana Katariya scores the first-ever hat-trick for the Indian Women's Hockey Team in the Olympics. 💙#INDvRSA #IndiaKaGame #TeamIndia #Tokyo2020 #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/DPshZMj36I
— Hockey India (@TheHockeyIndia) July 31, 2021
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना वंदनाच्या मोठ्या भावाने सांगितले की, “आम्ही ९ भावंडं आहोत. नेहमी आजी वंदनाला घरातील कामात आणि जेवण बनवण्यावर लक्ष देण्यास सांगायची. मात्र, वडील नेहमीच तिला पाठिंबा देत होते.”
वंदनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला गोल केला होता. यासोबतच भारतीय महिला हॉकी संघाने या ऑलिंपिकमधील आपला दुसरा विजय मिळवला. यापूर्वी भारतीय महिला संघाने १९८० मध्ये ऑलिंपिकमध्ये दोन सामने जिंकले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनलमध्ये पराभूत; संपला ऑलिंपिकमधील प्रवास