टोकियो। भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भालाफेक खेळात देशाची मान उंचावली आहे. त्याने या खेळात दुसऱ्याच प्रयत्नात सर्वाधिक लांब म्हणजेच ८७.५८ मीटर अंतरावर थ्रो करत सुवर्ण पदक निश्चित केले आणि देशाला टोकियो ऑलिंपिक्समधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. त्याच्या या सोनेरी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याला मोठमोठी बक्षीसे देऊन गौरवले आहे. मात्र गुजरातमधील एका पेट्रोल पंपच्या मालकाने अनोख्या पद्धतीने नीरजच्या यशाचा आनंद साजरा केला आहे.
गुजरात राज्यातील भरुच शहरात स्थित एका पेट्रोल पंपचे मालक अयूब पठाण यांनी आपल्या भागातील नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना मोफत पेट्रोल देण्याचे ठरवले आहे. ५०१ रुपये किंमतीचे पेट्रोल अगदी मोफत मिळणार असल्याने भरुचमधील नीरज नामक व्यक्तींची जणू लॉटरीच लागली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘अयूब यांनी आतापर्यंत नीरज नावाच्या ३० लोकांना मोफत पेट्रोल दिले आहे. त्यांची ही योजना पुढील २ दिवसांपर्यंत चालू असणार आहे,’ असे एएनआयने अयूब यांच्या हवाल्याने लिहिले आहे. मुळात सध्या भरुचमध्ये पेट्रोलची किंमत ९८ रुपये प्रति लीटर आहे. मात्र इतक्या महागड्या किंमतीची तमा न बाळगता अयूब यांनी अशाप्रकारे सुवर्ण पदक विजेत्या नीरजच्या यशाचा आनंद साजरा केला आहे.
गुजरात: ओलंपिक में गोल्ड मेडल जीतने वाले खिलाड़ी नीरज चोपड़ा के लिए भरुच में एक पेट्रोल पंप के मालिक अयूब पठान नीरज नाम के सभी लोगों को 501 रुपए का पेट्रोल मुफ़्त में दे रहे हैं।
उन्होंने कहा, "अब तक 30 लोगों को मुफ़्त में पेट्रोल दे चुके हैं। यह योजना अगले 2 दिन तक जारी रहेगी।" pic.twitter.com/461SXiQErJ
— ANI_HindiNews (@AHindinews) August 9, 2021
याव्यतिरिक्त हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही नीरजला पारितोषिके दिली आहे. ‘या सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राला आमच्या धोरणानुसार ६ कोटी रुपये आणि वर्ग १ श्रेणीची नोकरी दिली जाईल. आम्ही पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहोत, जिथे त्याला हवे असल्यास तो प्रमुख असेल. त्याला इतर खेळाडूंप्रणाणे ५० टक्के सवलतीसह भूखंडही दिला जाईल,’ असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अबब! भारत सरकारने गोल्ड मेडलिस्ट नीरजवर खर्च केलाय ‘इतका’ पैसा, प्रशिक्षकाचाच पगार कोटींच्या घरात
‘या’ कारणामुळे नीरजच्या डाएटमध्ये आहे चक्क पाणीपुरीचा समावेश, वाचा सविस्तर
ऑलिम्पिक स्पर्धेत ‘या’ द्रोणाचार्यांनी केलेल्या मेहनतीला आले अखेर यश; जाणून घ्या संपूर्ण माहिती