---Advertisement---

न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, हा खेळाडू दोन दिवस उतरणार नाही मैदानात…

---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बेसिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडचा संघ भक्कम स्थितीत आहे. मात्र असे असले तरी त्यांचा सलामीवीर फलंदाज टॉम ब्लंडेल या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्लंडेलला या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. पण असे असतानाही त्याने दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडकडून सलामीला फलंदाजी केली होती. मात्र या दुखापतीसाठी त्याला दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज सांगितले आहे.

तो आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरला नाही. तसेच उद्याही त्याच्या दुखापतीची तपासणी केल्यानंतरच त्याच्या खेळण्याबद्दल निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर त्याची दुखापत जर पूर्णपणे बरी असेल तर तो कधीही सामन्यात खेळू शकतो, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

ब्लंडेलने या दुखापतीनंतरही फलंदाजी करताना पहिल्या डावात 80 चेंडूत 30 धावांची खेळी केली होती.

या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या आहेत. भारत अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. तसेच त्याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 165 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 348 धावा करत 183 धावांची आघाडी घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---