पॅरिस ऑलिम्पिकचा रविवारी (11 ऑगस्ट) समारोप झाला. समारोप समारंभात हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ यानं नेत्रदीपक स्टंट परफॉर्म केले. त्यानं आपल्या अप्रतिम स्टंटनं सर्वांनाच चकित करून टाकलं. त्याचे सर्व स्टंट हॉलिवूडवर आधारित होते.
चित्रपटांमध्ये आपल्या खऱ्याखुऱ्या स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध असलेला सुपरस्टार टॉम क्रूझ सर्वप्रथम स्टेडियमच्या छतावर पोहोचला. त्यानं तपकिरी रंगाचं लेदर जॅकेट परिधान केलं होतं. टॉमनं तिथून खाली उडी मारली. त्याचा हा स्टंट पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
टॉम क्रूझनं दोरीचा वापर करून स्टेडियमच्या छतावरून खाली उडी मारली आणि दुचाकीवरून पॅरिसच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. त्यानंतर क्रूझ चक्क बाईकसह विमानात चढला, जे त्याला थेट लॉस एंजेलिसला घेऊन गेलं. टॉम क्रूझच्या या परर्फॉर्मन्सचा व्हिडिओ ऑलिम्पिक खेळांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलै रोजी सुरुवात झाली होती. सुमारे दोन आठवडे चाललेल्या या खेळांचा 11 ऑगस्ट रोजी समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज मनू भाकर आणि हॉकी टीमचा गोलकीपर श्रीजेश भारताचे ध्वजवाहक होते. या दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकं जिंकली आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भारत एकूण 6 पदकांसह गुणतालिकेत 71व्या स्थानी राहिला.
पुढील ऑलिम्पिकचं आयोजन अमेरिकातील लॉस एंजेलिस शहरात होणार आहे. येथे 14 जुलै ते 30 जुलै 2028 दरम्यान हे खेळ आयोजित केले जातील. विशेष म्हणजे, लॉस एंजेलिसनं यापूर्वी 1932 आणि 1984 मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं आहे.
हेही वाचा –
विनेश फोगटला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी, निवृत्तीच्या निर्णयावरही पुनर्विचार करण्याचं आवाहन
“विराट कोहलीमुळेच क्रिकेटचा 2028 ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला!”
मोहम्मद सिराजच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, संपूर्ण कुटुंबासह खास पोस्ट शेअर करत दिली माहिती