---Advertisement---

विनेश फोगटला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी, निवृत्तीच्या निर्णयावरही पुनर्विचार करण्याचं आवाहन

---Advertisement---

हरियाणातील अनेक खाप पंचायती महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या समर्थनार्थ उतरल्या असून या खाप पंचायतींनी विनेशला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याशिवाय या पंचायतींनी विनेश फोगटला भारतरत्न देखील देण्याची मागणी केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. यासह तिचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर विनेशनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, हरियाणातील खाप पंचायतींनी चरखी दादरी येथे ‘सर्व खाप महापंचायत’ आयोजित केली होती. या खाप पंचायतींनी विनेश फोगटला कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केलंय.

विनेश सोबत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करून तिला न्याय मिळावा, असं सांगवान खापचे प्रमुख सोंबीर सांगवान यांनी सांगितलं. त्यांनी कट-कारस्थानारकडेही लक्ष वेधलं. “विनेश फोगटचं वजन अचानक कसं वाढलं? तिच्यासोबत अनेक लोक होते. तिचं वजन वाढू नये याची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी होती”, असं ते म्हणाले आहेत. खाप पंचायतींच्या मागण्या मांडत सांगवान म्हणाले की, विनेशच्या कामगिरीचा विचार करून तिला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जावं.

सोंबीर सांगवान पुढे बोलताना म्हणाले की, विनेशला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला खेळाडूला ज्या सर्व सुविधा मिळतात, त्या सुविधा मिळायला हव्यात. याशिवाय त्यांनी विनेशला निवृत्ती परत घेऊन कुस्ती खेळणं सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय. विनेश फोगट हिनं राजकारणात प्रवेश करायचा की नाही? या प्रश्नावर ते म्हणाले की, ते तिच्यावर अवलंबून आहे.

 

हेही वाचा – 

“विराट कोहलीमुळेच क्रिकेटचा 2028 ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला!”
मोठी बातमी! विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, अन्य वरिष्ठ खेळाडूंनाही खेळण्यास सांगितलं
केन विल्यमसन कर्णधार नाही! भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---