---Advertisement---

आयपीएलमध्ये टाॅम करन या दोन भारतीय खेळाडूंची विकेट घेणारचं

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 9:19 PM
---Advertisement---

नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघात 3 सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका (3 Matches of T20 Series) पार पडली. या टी20 मालिकेत इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम करनने (Tom Curran) चांगली कामगिरी केली आहे.

यानंतर आता टॉमचे लक्ष आयपीएल 2020मध्ये (IPL 2020) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फंलदाज रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट घेण्यावर आहे.

आयपीएल 2020मध्ये टॉम आता आयपीएलचा माजी विजेत्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

विराट आणि रोहितबद्दल बोलताना टॉम म्हणाला की, तो विराट आणि रोहितचा चाहता आहे. परंतु जेव्हा त्याच्या हातात चेंडू असेल त्यावेळी तो जगातील दोन उत्कृष्ट फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने बाद करण्याचा प्रयत्न करेल.

“मला असे वाटते की, विराट आणि रोहित हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. एक गोलंदाज म्हणून आपल्या रणनीतीचा वापर करण्याचा आणि त्यांच्या कामगिरीपेक्षा आपल्या कामगिरीवर लक्ष देण्याची गरज आहे. हे शानदार आव्हान असेल. यासाठी मी तयार आहे,” असे विराट आणि रोहितबद्दल बोलताना टॉम म्हणाला.

टॉमला यावेळी विचारण्यात आले की, तो आयपीएलकडे आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी एक व्यासपीठ म्हणून पाहत आहे का? यावेळी उत्तर देताना टॉम म्हणाला की, “मी क्रिकेटमध्ये कोणताही सामना खेळतो तेव्हा मला वाटते की, त्याचा प्रभाव पडतोच. मग तो प्रभाव लहान असो किंवा मोठा. परंतु मी अधिक पुढचा विचार करत नाही.”

“मला एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्यायचे आहे. मी जेव्हाही मैदानावर उतरेल तेव्हा मी माझ्यात सुधारणा करेल, असा माझा प्रयत्न असतो,” असेही टॉम यावेळी म्हणाला.

 टॉमने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याची 2/19 ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

आयपीएल 2020च्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---