आयपीएलचा सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघ यावर्षीही कमालीचे प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यांनी आयपीएल २०२०च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. मुंबईच्या या यशामध्ये इशान किशन, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह या खेळांडूप्रमाणेच न्यूझींलडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचाही मोठा हात आहे. आता ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांनी बोल्टवरुन दिल्ली कॅपिटल्स संघाला टोमणा मारला आहे.
बोल्ट गेल्या २ वर्षांपासून दिल्ली संघाचा भाग होता. मात्र आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्लीने त्याला ट्रेड करत मुंबईकडे सोपवले. त्यामुळे बोल्ट यावर्षी मुंबईचे प्रतिनिधित्त्व करत आहे. याच बोल्टने दिल्लीविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कमालीचे गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने २ षटकात केवळ ९ धावा देत २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले होते.
इथेच दिल्ली संघ चुकला!
यानंतर मूडी यांनी दिल्लीवर निशाणा साधत म्हटले की, “माझ्या मते दिल्लीने बोल्टला मुंबईकडे सोपवणे हा एक असाधारण निर्णय होता. त्यावेळी त्यांना माहिती नव्हते की, आयपीएलचा हा हंगाम युएईत स्थानांतरित होणार आहे. ते काहीही असो, पण बोल्ट मुंबई संघासाठी एक खतरनाक खेळाडू ठरला आहे. कारण युएईच्या मैदानांवर त्याच्या चेंडूला स्विंग मिळतो.”
“बोल्ट आयपीएल सामन्यांच्या पावरप्लेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे या हंगामात आयपीएलच्या सर्वात मजबूत संघाला बोल्टच्या रुपात शानदार भेट देणे, हा असाधारण निर्णय ठरला. लिलावादरम्यान दिल्ली संघ बोल्टला मुंबईशिवाय इतर संघांनाही देऊ शकला असता,” असे शेवटी मूडी यांनी म्हटले.
ट्रेंट बोल्टची आकडेवारी
बोल्टची आयपीएलमधील गेल्या २ वर्षांतील आकडेवारीपेक्षा यंदाची आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने २०१८-१९मध्ये दिल्लीकडून १९ सामने खेळले असून २३ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, यावर्षी त्याने आतापर्यंतच्या १४ सामन्यात एकूण २२ विकेट्सची कामगिरी केली आहे. १० नोव्हेंबर रोजी आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यातही तो उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा