---Advertisement---

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टाॅप-10 फलंदाज! जो रूट ‘या’ दिग्गजांना मागे टाकून रचणार इतिहास

On: सोमवार, जून 9, 2025 4:32 PM
---Advertisement---

Most Runs In Test Cricket: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे आणि या मालिकेत सर्वांच्या नजरा ज्या फलंदाजावर असतील तो म्हणजे जो रूट. रेड बॉल क्रिकेटमध्ये 36 शतके झळकावणारा रूटची विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची असेल कारण तो एकटा संपूर्ण मालिकेचा मार्ग बदलू शकतो. अशा परिस्थितीत, जो रूट या मालिकेत खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि जर त्याने या मालिकेत 373 धावा केल्या तर तो अनेक दिग्गजांना मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. माजी भारतीय दिग्गजाने 200 सामन्यांच्या 329 डावांमध्ये 53.78च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत. या काळात तेंडुलकर 33 वेळा नाबाद राहिला आहे. तेंडुलकरने त्याच्या बॅटमधून 51 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 248 नाबाद आहे.

यानंतर, रिकी पॉन्टिंग यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने 168 कसोटी सामन्यांच्या 287 डावांमध्ये 51.85च्या सरासरीने 13,378 धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने 41 शतके आणि 62 अर्धशतके झळकावली आहेत. तर आफ्रिकेचा माजी कर्णधार जॅक कॅलिस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. जॅक कॅलिसने 166 सामन्यांच्या 280 डावांमध्ये 55.37च्या सरासरीने 13,289 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेला जो रूट या मालिकेत रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड यांना मागे टाकून या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. हे करण्यासाठी जो रूटला 373 धावा कराव्या लागतील. जो रूटच्या 13,006 धावा आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत 284 धावा करताच तो राहुल द्रविड आणि जॅक कॅलिसला मागे टाकेल. यादरम्यान पॉन्टिंगला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी 89 धावांची आवश्यकता असेल.

कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर: 15921 धावा
रिकी पॉन्टिंग: 13378 धावा
जॅक कॅलिस: 13289 धावा
राहुल द्रविड: 13288 धावा
जो रूट: 13006 धावा
अ‍ॅलिस्टर कुक: 12472 धावा
कुमार संगकारा: 12400 धावा
ब्रायन लारा: 11593 धावा
शिवनारायण चंद्रपॉल: 11867 धावा
माहेला जयवर्धने: 11714 धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्समध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल. मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्समध्ये, तर चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पाचवा सामना 31 जुलैपासून ओव्हलमध्ये खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---