ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपुर्वी यजमान इंग्लंड संघाला न्यूझीलंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. हे दोन्हीही सामने इंग्लंडच्याच मैदानावर होणार आहेत. दुसरीकडे पाहुणा भारत संघ इंग्लंडच्या भूमीत न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे आगामी इंग्लंड विरुद्ध भारत ही कसोटी मालिका देखील रंगतदार होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेचा विचार करायचा झाल्यास अनेक असे गोलंदाज आहेत, ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मात्र एकमात्र असा गोलंदाज आहे, ज्याने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तो म्हणजे, इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन होय.
या ३८ वर्षीय गोलंदाजाने २००६ ते २०२१ या कालावधीत भारताविरुद्ध एकूण ३० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान २.७८ च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ११८ विकेट्स चटकावल्या आहेत. यात त्याच्या २० धावांवर ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम खेळीचाही समावेश आहे. अँडरसनव्यतिरिक्त भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांत दोन्ही संघातील कोणताही गोलंदाज १०० विकेट्सचा आकडा गाठू शकलेला नाही.
भारतीय दिग्गज फिरकीपटू भागवत चंद्रशेखर हे ९५ विकेट्ससह या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. त्यांनी १९व्या शतकात २.५०च्या इकोनॉमी रेटने ९० हून अधिक विकेट्स घेत या स्थानावर ताबा मिळवला होता. चंद्रशेखर यांच्याबरोबर माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे हे ९० पेक्षा जास्त विकेट्स घेत तिसऱ्या स्थानावर आहेत.
आता भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या सक्रिय गोलंदाजांवर नजर टाकूयात. याबाबतीत अँडरसनबरोबर स्टुअर्ट ब्रॉड, आर अश्विन, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा यांची नावे पहिल्या पाच जणांमध्ये येतात. या सक्रिय गोलंदाजांनी आजवर भारत- इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेत ४५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
११८ विकेट्स – जेम्स अँडरसन
९५ विकेट्स – भागवत चंद्रशेखर
९२ विकेट्स – अनिल कुंबळे
८८ विकेट्स – आर अश्विन
८५ विकेट्स – बिशन सिंग बेदी, कपिल देव
७० विकेट्स – स्टुअर्ट ब्रॉड
६२ विकेट्स – डेरेक अंडरवुड, बॉब विलिस
६२ विकेट्स- इशांत शर्मा
५९ विकेट्स – आयन बॉथम
५४ विकेट्स – विनू मंकड
५३ विकेट्स – फ्रेड ट्रूमन
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने अवघ्या सातव्या सामन्यात उंचावलेलली आयसीसी ट्रॉफी, तर विराट ‘इतके’ सामने खेळून अजून प्रतिक्षेत
वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया
धोनीच्या पहिल्या क्रशचे नाव माहित आहे का? बायकोला सांगू नको असं म्हणत त्यानेच केलाय खुलासा