---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे 10 दिग्गज भारतीय खेळाडू, 3 द्विशतक करणाऱ्या खेळाडूंचा समावेश

On: गुरूवार, जुलै 3, 2025 10:06 PM
---Advertisement---

इंग्लंडची खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांना मदत करणारी राहिली आहे. या मैदानावर धावा करणे मोठे आव्हान मानले जाते. पण टीम इंडियाचे असे 10 दिग्गज खेळाडू झाले, ज्यांनी इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला. इंग्लिश गोलंदाज त्यांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

या यादीत आताया यादीत टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे (Shubman Gill) नाव देखील सामील झाले आहे. त्याने एजबेस्टनवर शानदार खेळी करत दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक पूर्ण केले. त्याने मालिकेच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकले होते आणि आता दुसऱ्या कसोटीत द्विशतक करून इतिहास रचला आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 2nd Test match) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया (Team India) मजबूत स्थितीत आहे. कर्णधार गिलच्या (Captain Shubman Gill) द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 550 धावांचा टप्पा पार केला आहे. यादरम्यान टीम इंडियाचे 7 खेळाडू बाद झाले. गिलने 269 धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वात मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. त्याने सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडला आहे.

शुबमन गिलच्या (Shubman Gill) आधी इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी 1997 मध्ये द ओव्हल मैदानावर 221 धावा केल्या होत्या. त्यांनी इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. गावस्कर, मग द्रविड आणि आता गिल हे तीन खेळाडू असे आहेत, ज्यांनी इंग्लंडच्या मैदानावर द्विशतक ठोकले आहे.

इंग्लंडच्या मैदानावर सर्वाधिक मोठी खेळी करणारे 10 भारतीय दिग्गज

शुबमन गिल – 250*, बर्मिंघम (2025)
सुनील गावस्कर – 221, द ओव्हल (1979)
राहुल द्रविड – 217, द ओव्हल (2002)
सचिन तेंडुलकर – 193, लीड्स (2002)
रवी शास्त्री – 187, द ओव्हल (1990)
वीनू मांकड – 184, लॉर्ड्स (1952)
मोहम्मद अझरुद्दीन – 179, मँचेस्टर (1990)
सचिन तेंडुलकर – 177, नॉटिंगहॅम (1996)
दिलीप वेंगसरकर – 157, लॉर्ड्स (1982)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---