रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याने ९५ चेंडूत १२३ धावांची खेळी करताना १६ चौकार आणि १ षटकार मारले. हे शतक त्याने ८५ चेंडूत पूर्ण केले. तसेच हे शतक त्याचे ४१ वे वनडे शतक आहे.
त्याने या सामन्यात भारताच्या पहिल्या तीन विकेट्स २७ धावांवर गेल्यानंतर डाव सावरताना एमएस धोनीबरोबर चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली आहे. तर केदार जाधव बरोबर ८८ आणि विजय शंकर बरोबर ४५ धावांची भागीदारी रचली आहे.
त्याचबरोबर अनेक विक्रमांनाही विराटने गवसणी घातली आहे. त्यातील हे काही निवडक विक्रम-
-२२५ वनडेनंतर सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-
४१- विराट कोहली
२७- हशीम आमला(१७४ सामने)
२५- एबी डिव्हिलियर्स
२३- सचिन तेंडूलकर
२२- रोहित शर्मा
२१- सौरव गांगुली
-३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने तब्बल ९वेळा शतकी खेळी केली आहे. त्याच्यापाठोपाठ जेसन राॅय आणि कुमार संगकाराने हा कारनामा ४वेळा केला आहे.
-सर्वात जलद ४१ वनडे शतके-
२१७ डाव- विराट कोहली
३६९ डाव- सचिन तेंडूलकर
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणारे खेळाडू-
९- सचिन तेंडूलकर (७० डाव)
८- विराट कोहली (३२ डाव)
७- रोहित शर्मा (३३ डाव)
६- डेसमंड हायनेस (६४ डाव)
-वनडेत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-
४९- सचिन तेंडूलकर (४५२ डाव)
४१- विराट कोहली (२१७ डाव)
३०- रिकी पाॅटिंग (३६५ डाव)
-अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
६०- सचिन तेंडूलकर (५३८ डाव)
४५- विराट कोहली (२५० डाव)
४४- ग्रॅहम गुच (६०१ डाव)
४०- जी हिक (६३० डाव)
३९- कुमार संगकारा (५०० डाव )
-एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
९- सचिन तेंडुलकर, विरुद्ध ऑस्ट्रेलिया
८- विराट कोहली, विरुद्ध श्रीलंका
८- सचिन तेंडूलकर, विरुद्ध श्रीलंका
८- विराट कोहली, वि ऑस्ट्रेलिया
७- रोहित शर्मा, वि ऑस्ट्रेलिया
७- सनथ जयसुर्या, वि भारत
७- विराट कोहली, वि विंडीज
७- सईद अन्वर वि. श्रीलंका
-विराट कोहलीची ४१ वनडे शतके-
८- श्रीलंका
८- ऑस्ट्रेलिया
७- विंडीज
५- न्यूझीलंड
४- दक्षिण आफ्रिका
३- इंग्लंड
३- बांगलादेश
२- पाकिस्तान
१- झिंबाब्वे
-आशिया खंडात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू-
७१- सचिन तेंडुलकर
४५- कुमार संगकारा
४१- विराट कोहली
३९- माहेला जयवर्धने
३३- युनिस खान
-मायदेशात वनडेत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
२०- सचिन तेंडूलकर
१९- विराट कोहली
१४- हाशिम आमला
१३- रिकी पाॅटिंग
११- राॅस टेलर
-वनडेत कर्णधार असताना भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
३- विराट कोहली
२- एमएस धोनी
-वनडेत एकही षटकार न मारता सर्वाधिक वेळा शतक करणारे भारतीय फलंदाज
११- विराट कोहली
९- सचिन तेंडूलकर
६- गौतम गंभीर
६- राहुल द्रविड
-वनडेमध्ये सर्वात जलद ४००० धावा करणारे कर्णधार-
६३ डाव – विराट कोहली
७७ डाव – एबी डिविलियर्स
१०० डाव – एमएस धोनी
१०३ डाव – सौरव गांगुली
१०६ डाव – सनथ जयसुर्या
महत्त्वाच्या बातम्या –
–हँड्सकॉम्बच्या त्या विकेटमुळे आज झाला मोठा वाद…
–२०१९मध्ये विराटने वनडेत प्रत्येक दिवशी सरासरी केल्यात ७.४२ आंतरराष्ट्रीय धावा
–एबी डिविलियर्स, धोनी यांना मागे टाकत किंग कोहलीने केला विश्वविक्रम
–जाणून घ्या, रोहित शर्मा नक्की आउट होता की नाही…
–गेल्या ५ सामन्यातील भारतीय सलामीवीरांची कामगिरी पहाच