ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही प्रकारच्या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून भारत सिडनीच्या मैदानावर पहिल्या वनडे सामन्यासह या दौर्याची सुरुवात करेल. या दौर्यावर भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने, ३ टी२० सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल. भारतीय संघ गेल्या वेळी ऑस्ट्रेलिया दौर्यावर आला असताना, ऑस्ट्रेलिया संघाचे काही महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध नव्हते व याचाच फायदा भारताने उचलला होता. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख खेळाडू संघात परतले आहेत.
जेव्हा जेव्हा एखादा संघ ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरतो, तेव्हा त्या संघासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे अवघड जाते. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असतात आणि ऑस्ट्रेलियाकडे कायमच दर्जेदार वेगवान गोलंदाज राहिले आहेत. याचाच फायदा घेऊन, ऑस्ट्रेलियन संघ विरुद्धसंघांवर अधिराज्य गाजवतो. भारताला आगामी मालिकांत याच ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणापासून सावध राहण्याची गरज आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न बऱ्याच खेळाडूंनी केला. मात्र, सर्वांना त्यात यश आले नाही. ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर शतक झळकावण्याची कामगिरी काहीच खेळाडूंना वारंवार करता आली. आज अशाच तीन फलंदाजांविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके झळकावली.
३) सर विवियन रिचर्ड्स
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स हे तिसर्या क्रमांकावर आहेत. ७० आणि ८० च्या दशकात रिचर्ड् हे सर्वात विस्फोटक फलंदाज मानले जायचे. रिचर्ड्स यांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर तीन वनडे शतके साजरी केली आहेत. रिचर्ड् यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० वनडे सामने खेळताना ५६.२० च्या सरासरीने १,९०५ धावा ठोकल्या होत्या. यात त्यांची सर्वोत्कृष्ट खेळी १५३ धावांची राहिली आहे.
२) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अनेकदा बलाढ्य संघांविरुद्ध जबरदस्त कामगिरी करताना दिसून येतो. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच दमदार फलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असणाऱ्या खेळपट्ट्यांवर कोहलीने भरपूर धावा काढून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलेले दिसते. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १५ वनडे सामने खेळताना ४ शतके ठोकली आहेत. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतही भारतीय संघ आणि चाहत्यांना विराटकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
१. रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध नेहमीच मोठी धावसंख्या रचताना दिसतो. ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळताना त्याला अधिकच स्फुरण चढते. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळलेल्या १९ वनडे सामन्यात सामन्यात ४ शतके झळकावली आहेत. आगामी वनडे मालिकेत रोहित भारतीय संघासाठी उपलब्ध असणार नाही. तो सध्या हॅमस्ट्रींगच्या दुखापतीतून सावरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम करण्यास रॉस टेलर सज्ज
…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी
टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटेनर करणार नेतृत्व
ट्रेंडिंग लेख –
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक
‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी