कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 2020 या वर्षात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात थोड्याफार क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे क्रीडा स्पर्धांचे आयोजन पुढे ढकलण्यात आले, तर काही आयोजन रद्द केले. त्यामुळे क्रिकेटचे सामने जास्त प्रमाणात पाहायला मिळाले नाहीत. मात्र, क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहेत.
त्यामुळे यंदा भारतातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलचे सामने युएईत पार पडले. त्याचबरोबर आणखी काही टी-20 सामने पार पडले. टी-20 या क्रिकेटच्या प्रकारात प्रामुख्याने फलंदाजाचा बोलबाला जास्त पाहिला मिळतो. परंतु 2020 या वर्षात असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी या वर्षी गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करत आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला आहे. आपण आज या लेखामधून 2020 मध्ये आपल्या गोलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करताना सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत, अशा तीन गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
टी-20 क्रिकेटमध्ये 2020 या वर्षात सर्वात जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज
3. 15 विकेट्स- आफताब हुसैन
हॉंगकॉंग या देशासाठी खेळताना टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या आफताब हुसैनने यंदा दमदार कामगिरी केली आहे. हुसैनने हाँगकाँग संघासाठी गोलंदाजी करताना सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 9 सामन्यात 225 धावा देताना 15 विकेट्स प्राप्त केल्या.
त्याची सर्वोत्तम कामगिरी करताना 14 धावा देताना 3 विकेट्स मिळवल्या आहेत. हुसैनचा इकॉनॉमी रन रेट सुद्धा 7 पेक्षा कमी आहे. त्यामुळे हे दिसून येते की त्याने कमी धावा देत जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
2. 16 विकेट्स- हॅरिस रऊफ
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये आपल्या गोलंदाजीने हॅरिस रऊफने प्रभावित केले होते. त्यानंतर हॅरिसने 24 जानेवारी 2020 रोजी बांगलादेश विरुद्ध टी-20 सामना खेळताना पाकिस्तान संघासाठी पदार्पण केले. या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी करताना फलंदाजांना अडचणीत आणले आहेत.
त्याचबरोबर विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत. यावर्षी पाकिस्तान संघासाठी 11 टी-20 सामने खेळताना त्याने 372 धावा देत 16 विकेट्स मिळवल्या. हॅरिसने या वर्षी टी-20 सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ही 29 धावा देवून 3 विकेट्स आहे.
1. 17 विकेट्स- लुंगी एंगिडी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एंगिडीने यंदा टी-20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने यंदाच्या वर्षात सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
लुंगी एंगिडीने 2020 मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी 9 सामने खेळताना 349 धावा देताना 17 विकेट्स मिळवल्या आहेत. लुंगी एंगिडीने सर्वोत्तम कामगिरी करताना 30 धावा देवून 3 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्य निवडकर्ता पदासाठी अजित आगरकरचे नाव चर्चेत, इतर दिग्गजही स्पर्धेत