सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्याची ‘बॉर्डर-गावसकर’ ट्रॉफी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे, तर दुसरा सामना ‘बॉक्सिंग डे’ ला होणार आहे. हा सामना मेलबर्न येथे शनिवारी (26 डिसेंबर) खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील हा 100वा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खास आहे.
या सामन्यात भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. या सामन्यावर सर्व जगाचे लक्ष लागले आहे. कारण पहिल्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे आणि या सामन्यात भारतावर पुनरागमन करण्याचा दबाव आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पुनरागमन करणार का? तसेच तो आपल्या खेळाडूंकडून चांगले प्रदर्शन करून घेऊन ऑस्ट्रेलिया संघावर मात करेल का? अशाप्रकारचे प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात घोंगावत असतील. ज्यांची उत्तरे 26 डिसेंबरला मेलबर्न येथे सुरू होणार्या ‘बॉक्सिंग डे’ सामन्यात मिळणार आहेत.
मेलबर्न येथे खेळला जाणारा ऐतिहासिक सामना
त्याचबरोबर हा दुसरा सामना अजून एका कारणासाठी खास असणार आहे. कारण हा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळला जाणारा 100 वा कसोटी सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघात 99 कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. मेलबर्न येथे खेळला जाणारा सामना ऐतिहासिक असणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध 100 कसोटी खेळणारा दुसरा संघ ठरणार आहे.
इंग्लंड संघाने भारताविरुद्ध खेळलेत सर्वाधिक 122 सामने
भारता विरुद्ध 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा आतापर्यंत इंग्लंड हा पहिला संघ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 122 कसोटी सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. त्याचबरोबर या बाबतीत ऑस्ट्रेलिया संघ दुसर्या क्रमांकावर आहे, त्यांनी भारताविरुद्ध 99 कसोटी सामने खेळले आहेत. या यादीत तिसर्या स्थानी वेस्ट इंडिज संघ आहे. त्यांनी भारताविरुद्ध आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत.
भारताविरुद्ध पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने 59 सामने खेळलेत
भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या यादीत न्यूझीलंड चौथ्या, तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड संघाने भारताविरुद्ध 59 सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने सुद्धा भारताविरुद्ध 59 कसोटी सामने खेळले आहेत. परंतु आता भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात सामन्याचे आयोजन केले जात नाही.
भारताविरुद्ध सर्वाधिक जास्त कसोटी सामने खेळणारे 6 संघ:
इंग्लंड- 122 कसोटी सामने
ऑस्ट्रेलिया- 99 कसोटी सामने
वेस्ट इंडिजचा- 98 कसोटी सामने
न्यूझीलंड- 59 कसोटी सामने
पाकिस्तान- 59 कसोटी सामने
श्रीलंका- 44 कसोटी सामने
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्य निवडकर्ता पदासाठी अजित आगरकरचे नाव चर्चेत, इतर दिग्गजही स्पर्धेत