क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारामध्ये गोलंदाजाची भूमिका नेहमी महत्त्वाची असते. तसं बघायला गेलं तर ज्या संघाकडे उत्कृष्ट गोलंदाज असतात, त्यांचं प्रदर्शन मोठया स्पर्धांमध्ये नेहमी उत्तुंग यश प्राप्त करतात. तसे क्रिकेटच्या इतिहासात महान गोलंदाज होऊन गेले. वसीम अक्रम, वकार युनिस, ब्रेट ली, ग्लेन मॅग्रा, शोएब अख्तर, कर्टनी वॉल्श ह्यांचा या यादीत समावेश आहे.
वनडे असो वा कसोटी संघाचा विजय आणि पराभव हे गोलंदाजीवर अवलंबून असते. क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाज १-२ सामने जिंकवून देऊ शकतो, पण जर एखादी मालिका अथवा स्पर्धा जिंकायची असेल, तर गोलंदाजांना उत्कृष्ट प्रदर्शन करावं लागेल. त्यामुळे गोलंदाजीचे महत्त्व कायम असते.
एका गोलंदाजाचं ध्येय हेच असतं की धावा कमी देऊन बळीपण घेणे. काही गोलंदाज कधी कधी खूप धावा देतात. आज आपण जाणून घेऊया भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा देणारे कोणते ३ गोलंदाज आहेत ते.
१. अनिल कुंबळे
वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा अनिल कुंबळेनी दिल्या आहेत. अनिल कुंबळे बरीच वर्ष वनडे आणि कसोटी खेळत होते. कसोटीमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा त्यांचा विक्रम देखील आहे. परंतु, वनडेमध्ये त्यांनी जास्ती धावा दिल्या, असं दिसून येत आहे.
अनिल कुंबळेंनी आपल्या वनडे कारकिर्दीत १९९० पासून २००७ पर्यंत २७१ सामने खेळले आणि त्यात १०,४१२ धावा दिल्या, तसेच ३३७ बळी देखील घेतले.
२. हरभजन सिंग
महान गोलंदाज हरभजन सिंग ह्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडेत बऱ्याच वेळी फलंदाज ह्याच्या गोलंदाजीवर विकेट देण्याबरोबरच बरेच धावा करायचे. हरभजन सिंगने आपल्या वनडे कारकिर्दीत १९९८ ते २०१५ ह्या कालावधीत २३६ सामने खेळून ८,९७३ धावा दिल्या. तसेच वनडे मध्ये २६९ बळी देखील घेतले.
३. जवागल श्रीनाथ
ह्या यादीत माजी जलद गोलंदाज जवागल श्रीनाथ ह्यांचा तिसरा क्रमांक लागतो. श्रीनाथ त्यांच्या काळातले उत्कृष्ट गोलंदाज होते आणि भारतीय आक्रमक गोलंदाजीचे ते प्रतिनिधीत्व करायचे. त्यांनी १९९१ ते २००३ दरम्यान २२९ वनडे खेळून ८,८४७ धावा दिल्या.
२००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती, त्यात जवागल श्रीनाथ ह्यांचा देखील समावेश होता. त्यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत ३१५ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या कामगिरीचा जगभर डंका वाजवूनही भारताचे नेतृत्त्व करण्याची संधी न मिळालेले ३ दिग्गज
‘हलाल मांस’ विवादावर बीसीसीआयने सोडले मौन, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिले स्पष्टीकरण
जरा बचके!! न्यूझीलंडचे ‘हे’ ५ शिलेदार भारतीय संघासाठी ठरू शकतात ‘खलनायक’