---Advertisement---

महिला टी२० विश्वचषकातील भारताचे टॉप ३ गोलंदाज

On: रविवार, मार्च 8, 2020 10:10 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ८ मार्चला आहे. हा सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने पराभव स्विकारलेला नाही. भारताच्या या शानदार कामगिरीत गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. भारतीय गोलंदाजांनी या विश्वचषकात प्रत्येक सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

जाणून घेऊयात भारताच्या टॉप 3 गोलंदाजांबद्दल….

  1. पूनम यादव:- लेगस्पीनर पूनम यादवने 4 सामन्यात 9 फलंदाजांना माघारी धाडले आहे. तिने गट साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 षटकात केवळ 19 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. ही तिची या विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे. 
  2. शिखा पांडे :- भारतची मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे 4 सामने खेळली असून तिला 7 विकेट्स घेण्यात यश आले आहे. तिने या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
  3. राधा यादव :- राधा यादवने या विश्वचषकात 2 सामनेच खेळले असले तरी तिने या दोन सामन्यात मिळून 5 विकेट्स मिळवल्या आहेत. तिने श्रीलंकेविरूद्ध  23 धावांमध्ये 4 विकेट्स घेण्याची शानदार कामगिरी केली. तसेच तिने न्यूझीलंड विरुद्ध 1 विकेट घेतली. 

महत्त्वाच्या बातम्या – 

महिला टी२० विश्वचषकातील या आहेत भारताच्या टॉप ३ फलंदाज

टी२० विश्वचषकात टीम इंडियासाठी हे ५ टप्पे ठरले महत्त्वाचे!

भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणाऱ्या विश्वचषक फायनलबद्दल सर्वकाही…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---