---Advertisement---

वनडे कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणारे ३ भारतीय, एकाने पदार्पणात केलंय शतक

On: शुक्रवार, जून 4, 2021 5:04 AM
---Advertisement---

एकशे चाळीस कोटींचा हा महाकाय भारत देश विविध भाषा, धर्म, जातीपाती, पंथ यामध्ये विभागलेला आहे. या सर्वांना जोडणारा एक समान धागा असेल तर तो म्हणजे ‘क्रिकेट’. गोरे साहेब भारतात सोडून गेलेली ही सगळ्यात चांगली गोष्ट. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असत की एक दिवस राष्ट्रीय संघाकडून खेळायचे. परंतु सगळेच काही यात यशस्वी होत नाहीत. मात्र काही खेळाडू बऱ्याच काळापर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि जबरदस्त प्रदर्शन देखील करत असतात.

तर मित्रानो आज तुम्हाला ३ भारतीयांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी आपल्या एकदिवसीय पदार्पणातच शानदार कामगिरी केली होती. त्यातल्या एका खेळाडूने तर पदार्पणातच शतक ठोकून दणक्यात आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता.

3. ब्रिजेश पटेल:
ब्रिजेश पटेल यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 21 कसोटी आणि एकूण 10 एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात अतिशय जबरदस्त केली होती. परंतु ते नंतर आपली लय कायम ठेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याला फक्त 10 वनडे सामने खेळता आले.

13 जुलै 1974 रोजी इंग्लंडविरुद्ध लीड्सच्या मैदानावर त्यांनी आपले वनडे पदार्पण केले होते. त्यात त्यांनी 82 धावांची सुरेख खेळी केली होती. जरी तो सामना भारतीय संघ हरला होता; तरी ब्रिजेश पटेल यांनी भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारली होती.

2. रॉबिन उथप्पा:
रॉबिन उथप्पाने 15 एप्रिल 2006 रोजी इंदोरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध आपले पदार्पण केले होते आणि पदार्पणातच 86 धावांची जबरदस्त खेळी केली होती. ही त्याच्या कारकिर्दीची देखील सर्वोच्च खेळी होती. या जबरदस्त खेळीच्या मदतीने भारताने 7 विकेट्सने तो सामना जिंकला होता. उथप्पाने आतापर्यंत 46 वनडे सामन्यात भारतचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 2015 पासून तो भारतीय संघापासून दूर आहे.

1. केएल राहुल:
वनडे पदार्पणातच सर्वाधिक धावा कण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याव्यतिरिक्त तो असा एकमेव भारतीय खेळाडू ज्याने पदार्पणातच शतक ठोकले आहे. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात हरारेच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध 11 जून 2016 ला नाबाद शतकीय खेळी करून केली होती. यासह तो पहिल्याच वनडे सामन्यात सामनावीर देखील झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवी भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्यावर दुर्लक्षित, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे

आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामात ‘अशी’ असेल सर्व फ्रँचायझींची प्लेइंग इलेव्हन

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर ‘असे’ होते सीएसके संघातील वातावरण, ऋतुराजने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---