प्रो कबड्डीचा ६वा बहुचर्चित हंगाम पुढच्या महिन्यात ७ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. या हंगामात गेल्या हंगामाप्रमाणेच १२ संघ असणार आहे. तसेच सामन्यांची संख्याही वाढली आहे.
याचकारणामुळे प्रो कबड्डीमधील ४ खेळाडूंना एक खास विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
प्रो कबड्डीमध्ये रेड आणि टॅकल मिळुन ५०० गुण घेण्याची संधी यावेळी ४ खेळाडूंना आहे. यातील सर्वात आघाडीचे नाव म्हणजे युपी योद्धाजचा स्टार खेळाडू रिशांक देवाडिगा. त्याने ८० सामन्यात आजपर्यंत ४९० गुण घेतले आहे. त्याला केवळ १० गुणांची गरज आहे.
या यादीत अष्टपैलू खेळाडू मनजीत चिल्लर (४५५) आणि संदिप नरवाल (४१७) तर बेंगलोरचा रेडर रोहित कुमारही (४४०) आहे.
यापुर्वी प्रो कबड्डीमध्ये केवळ ६ खेळाडूंना हा जादुई आकडा पार करता आला आहे. त्यात राहुल चौधरी (७९ सामन्यात ७१०), परदिप नरवाल ( ६४ सामन्यांत ६३२), दिपक हुडा (८१ सामन्यांत ५७७), अजय ठाकूर (८० सामन्यांत ५४९ ), अनुप कुमार ( ७८ सामन्यांत ५४६) आणि काशिलिंग अडके( सामन्यांत ) यांचा समावेश आहे.
यावर्षी प्रो कबड्डीत ५०० गुण करण्याची संधी असलेले टाॅप ४ खेळाडू-
४९०- रिशांक देवाडिगा, सामने- ८०
४५५- मनजीत चिल्लर, सामने- ७४
४४०- रोहित कुमार, सामने- ४८
४१७- संदिप नरवाल, सामने- ८३
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी
–पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर
–काय सांगता! सचिनचा गोलंदाजीतील विक्रम आज जडेजा मोडणार?