इंडियन प्रीमियर लीग 18 व्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. आज शुक्रवार स्पर्धेतील 8 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये खेळला जाणार आहे. हंगामाच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा रोमांचक सामने बघायला मिळालेले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारा फलंदाज ट्रेविस हेड आहे. जो सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळत आहे. या यादीत पाच फलंदाजांमध्ये कोणताही भारतीय फलंदाज सामील नाही.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेडने राजस्थान रॉयल्स विरुद्ध रविवार 23 मार्च रोजी झालेल्या सामन्यात 105 मीटर षटकार लावला होता हा आयपीएल 2025 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आहे. या सामन्यात हेडने 31 चेंडूत 67 धावा केल्या होत्या, त्यामध्ये त्याने 3 षटकार आणि 9 चौकार झळकावले होते.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू ट्रीसन स्टब्स आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये सर्वात लांब षटकार लावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात 98 मीटर षटकार लावला होता. हा सामना दिल्लीने एका विकेटने जिंकला होता.
आयपीएल 2025 मध्ये सर्वात लांब षटकार लावणाऱ्या फलंदाजांची यादी
1.ट्रेविस हेड (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स -105 मीटर
2.ट्रीसन स्टब्स (DC) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स -98 मीटर
3.शेरफेन रुदरफोर्ड (GT) विरुद्ध पंजाब किंग्स -97 मीटर
4.निकोलस पूरन (LSG) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद -97 मीटर
5.निकोलस पूरन (LSG) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद- 96 मीटर
सर्वात लांब षटकार लावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप 5 खेळाडूंमध्ये दोन षटकार तर निकोलस पुरणच्या नावावर आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात त्याने हैदराबाद विरुद्ध 70 धावांची शानदार पारी खेळली होती. या यादीत त्याने एक लांब षटकार 97 मीटर तर दुसरा 96 मीटर लावला होता. 26 चेंडूत खेळलेल्या या पारी मध्ये त्याने 6 षटकार आणि 6 चौकार झळकावले होते.
आयपीएलच्या सुरुवातीस 7 सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये टॉपच्या स्थानी आरसीबी संघ आहे, ज्यांनी एक सामना जिंकलेला आहे. तसेच त्यांचा नेट रन रेट (+2.137) अन्य संघांपेक्षा चांगला आहे. 4 संघ लखनऊ, हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थान दोन-दोन सामने खेळलेले आहेत, पण कोणत्याही संघाने दोन्ही सामने जिंकलेले नाहीत.






