आंतरराष्ठ्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या नावावर चांगले-वाईट रेकाॅर्ड करून ठेवले आहेत. तत्पूर्वी आपण या बातमीद्वारे अशा 5 वेगवान गोलंदाजांविषयी जाणून घेऊया ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, या यादीत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.
जेम्स अँडरसन- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्य़ा बाबतीत इंग्लंडचा वेगवान दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने 401 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि एकूण 991 विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीत 704, एकदिवसीय सामन्यात 269 आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 18 विकेट्स घेतल्या.
ग्लेन मॅकग्रा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने एकूण 376 सामने खेळले. त्याने 124 कसोटीत 563 विकेट्स, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 250 सामन्यात 381 विकेट्स घेतल्या. त्याने 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.
वसीम अक्रम- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पाकिस्तानचा वसीम अक्रम (Wasim Akram) तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज अक्रमने 460 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 916 विकेट्स घेतल्या आहेत. अक्रमने एकूण 104 कसोटी सामन्यात 414 विकेट्स घेतल्या. त्याने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 502 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज होता.
स्टुअर्ट ब्रॉड- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने 344 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 847 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉडने 167 कसोटी सामन्यात 604 विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर 121 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 178 विकेट्स आहेत. त्याने 56 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 65 विकेट्स घेतल्या.
शॉन पोलॉक- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा शाॅन पोलाक (Shaun Pollock) पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने 423 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 829 विकेट्स घेतल्या. त्याने 108 कसोटी सामन्यात 421 विकेट्स घेतल्या. 303 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 393 विकेट्स घेतल्या, तर 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
या बाबतीत जो रूट विराटपासून खूपच दूर; पाहा किंग कोहलीचा हा विश्वविक्रम!
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ 4 खेळाडूंनी फेकले सर्वाधिक NO-BALL
रोहितची नेतृत्वशैली, धोनी-कोहलीपेक्षा वेगळी; दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा