---Advertisement---

कोहलीला मैदानावर सतत नडणारे ५ गोलंदाज, एक आहे…

On: गुरूवार, जून 4, 2020 9:12 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करताना अनेक मोठमोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विराट आयसीसीच्या क्रमवारीतही तिन्ही प्रकारात पहिल्या १० फलंदाजांमध्ये आहे.  तसेच तिन्ही प्रकारात ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचे सातत्य पाहिले तर कोणत्याही गोलंदाजासाठी त्याची विकेट मिळणे आनंद देणारा क्षण ठरतो.

या लेखात विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांबद्दल आढावा घेण्यात आला आहे.

विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारे गोलंदाज –

७. ऍडम झम्पा –

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाने विराटला नजीकच्या काळात खूप त्रास दिला आहे. त्याने विराटला ७ वेळा बाद केले आहे. विराट विरुद्ध त्याची सरासरी ३०.५७ अशी आहे. झम्पाने अजून कसोटी पदार्पण केले नाही.

पण झम्पा आणि विराट आत्तापर्यंत १३ वनडे सामन्यात आमने-सामने आले आहेत. यातील ५ सामन्यात झम्पाने विराटला बाद केले आहे. तसेच ८ टी२० सामन्यात हे दोघे आमने-सामने आले आहेत. यात झम्पाने टी२०मध्ये वेळा विराटला बाद केले आहे.

६. रवी रामपाल –

विराटला वेस्ट इंडिजचा गोलंदाज रवी रामपालने देखील ७ वेळा बाद केले आहे. तो विराट विरुद्ध सर्वात यशस्वी झालेला वेस्ट इंडिजचा गोलंदाज आहे. त्याची विराट विरुद्धची सरासरी २२.८६ आहे.

ते दोघे एकमेकांविरुद्ध १७ सामने खेळले आहेत. यात १२ वनडे सामन्यांचा समावेश आहे. तर १ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. रामपालने विराटला वनडेत ६ वेळा बाद केले आहे. तर कसोटीत १ वेळा बाद केले आहे.

५. मॉर्ने मॉर्केल –

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलनेही विराटला ७ वेळा बाद केले आहे. विराट आणि मॉर्ने मॉर्केल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ सामन्यात आमने-सामने आले आहेत. त्याची विराट विरुद्धची सरासरी ३६.८६ एवढी आहे. ५०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतलेल्या मॉर्केलने विराटला वनडेत ३ वेळा तर कसोटीत ४ वेळा बाद केले आहे.

४. नॅथन लायन –

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने देखील विराटला ७ वेळा बाद केले आहे. त्याची विराट विरुद्धची सरासरी ६९.१४ अशी राहिली आहे. ते दोघेही २५ सामन्यात आमने-सामने आले आहेत. लायनला विराट विरुद्ध वनडे किंवा टी२० मध्ये गोलंदाजी करण्याची अधिक संधी मिळाली नसली तरी त्याने बऱ्याचला कसोटीत त्याच्याविरुद्ध गोलंदाजी केली आहे. तसेच विराटला ७ वेळा त्याने कसोटीतच बाद केले आहे.

३. जेम्स अँडरसन – 

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची विराट विरुद्धची आकडेवारी चांगली आहे. त्याने विराटला ३१.३८ च्या सरासरीने ८ वेळा बाद केले आहे. विराट आणि अँडरसन १७ वेळा कसोटीत आमने सामने आले असून अँडरसनने कसोटीत विराटला ५ वेळा बाद केले आहे. यातील ४ वेळा त्याने २०१४ ला भारताच्या इंग्लंड दौऱ्यात त्याने बाद केले होते.

तसेच अँडरसन आणि विराट १२ वनडे सामन्यातही आमने-सामने आले होते. त्यातील ३ सामन्यात अँडरसनने विराटला बाद केले होते.

२. ग्रॅमी स्वान –

इंग्लंडचा गोलंदाज ग्रॅमी स्वान हा विराट विरुद्ध सर्वात यशस्वी ठरलेला फिरकीपटू आहे. त्याने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा बाद केले आहे. विराट विरुद्ध त्याची सरासरीने १६.२५ इतकी आहे. स्वान आणि विराट ४ वेळा कसोटीत आमने-सामने आले. त्यातील ३ वेळा स्वानने विराटला बाद केले आहे.

तर १२ वनडेत आमने-सामने आले असताना स्वानने विराटला ४ वेळा बाद केले आहे. तसेच ३ टी२० सामन्यातही विराट आणि स्वान आमने-सामने आले होते. त्यात १ वेळा स्वानने विराटला बाद केले आहे.

१. टीम साऊथी – न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी विराट कोहलीविरुद्ध सर्वाधिक यशस्वी ठरलेला गोलंदाज आहे. त्याने तब्बल १० वेळा विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद केले आहे. यावेळी त्याची सरासरी ३३.६ इतकी आहे.

साऊथी आणि विराट ५ कसोटीत आमने-सामने आले आहेत. यात ३ वेळा साऊथीने विराटला बाद केले आहे. तसेच २० वनडे सामन्यात आमने-सामने आले असताना साऊथीने विराटला ६ वेळा बाद केले आहे. त्याचबरोबर विराट आणि साऊथी ६ वेळा टी२०मध्ये आमने-सामनेे आले आहेत. पण टी२०मध्ये साऊथीला केवळ १ वेळा विराटला बाद करता आले होते.

विशेष म्हणजे २०१९-२० च्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात तिन्ही प्रकारात मिळून साऊथीने विराटला ३ वेळा बाद केले आहे.

ट्रेंडिंग लेख – 

केवळ ३ वनडे विश्वचषक खेळून तिनही विश्वचषक जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू

भारतीय मुलींबरोबर लग्न करुन सुखी संसार थाटणारे ४ पाकिस्तानी क्रिकेटपटू

स्टंपमधील मायक्रोफोनमधून ऐकलेल्या ५ गमतीशीर शेरेबाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---