---Advertisement---

WPL 2024: लिलावातील अशा 5 खेळाडू, ज्यांना मिळाली 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम; भारताच्या 2 रणरागिणींचाही समावेश

Shabnim-Ismail-And-Kashvee-Gautam
---Advertisement---

WPL 2024 Auction: महिला प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत पार पडला. या लिलावात जगभरातील दिग्गज महिला खेळाडूंसह अनकॅप्ड खेळाडूंनी आपली नावे दिली होती. यातील काही खेळाडूंना बेस प्राईजपेक्षा एक-दोन पट नाही, तर 10 आणि 20 पटींनी जास्त रक्कम मिळाली, तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. तसेच, काही अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्याही भुवया उंचावल्या. चला तर, डब्ल्यूपीएल 2024 लिलावातील 5 महागड्या खेळाडू कोण आहेत, जाणून घेऊयात…

डब्ल्यूपीएल 2024 लिलावातील 5 महागड्या खेळाडू
1. एनाबेल सदरलँड- 2 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
महिला प्रीमिअर लीग 2024 (Womens Premier League 2024) लिलावात महागडी ठरलेली खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियन एनाबेल सदरलँड (Annabel Sutherland) होय. एनाबेलने लिलावासाठी आपली बेस प्राईज 40 लाख रुपये ठेवली होती. मात्र, तिच्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाने 2 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले. काशवी आणि एनाबेल या दोघींवरच 2 कोटी रुपयांची बोली लागली.

2. काशवी गौतम- 2 कोटी (गुजरात जायंट्स)
डब्ल्यूपीएल 2024 लिलावात (WPL 2024 Auction) सर्वात महागडी ठरलेली दुसरी खेळाडू म्हणजे, भारताची काशवी गौतम (Kashvee Gautam) होय. अवघ्या 20 वर्षीय काशवीने या लिलावासाठी आपली बेस प्राईज फक्त 10 लाख रुपये ठेवली होती. मात्र, या अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेली) अष्टपैलू खेळाडूला संघात घेण्यासाठी संघांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. अखेर गुजरात जायंट्स संघाने तिला 2 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील केले.

3. वृंदा दिनेश- 1 कोटी 30 लाख (यूपी वॉरियर्झ)
या लिलावात सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूंच्या यादीतील तिसरी खेळाडू म्हणजे भारतीय वृंदा दिनेश (Vrinda Dinesh) होय. वृंदाने या लिलावात फक्त 10 लाख रुपये बेस प्राईज ठेवली होती. मात्र, ज्याप्रकारे तिच्यावर बोली लागली, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वृंदावर यूपी वॉरियर्झ संघाने तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले.

4. शबनीम इस्माइल- 1 कोटी 20 लाख (मुंबई इंडियन्स)
डब्ल्यूपीएल लिलावात दक्षिण आफ्रिकेची स्टार वेगवान गोलंदाज शबनीम इस्माइल (Shabnim Ismail) हिचेदेखील नशीब चमकले आहे. तिने या लिलावासाठी तिची बेस प्राईज 40 लाख रुपये ठेवली होती. मात्र, तिला या रक्कमेच्या तीन पट जास्त म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये मिळाले. मुंबई इंडियन्सने तिच्यावर एवढी मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले.

5. फीबी लिचफील्ड- 1 कोटी (गुजरात जायंट्स)
ऑस्ट्रेलियाची फलंदाज फीबी लिचफील्ड (Phoebe Litchfield) ही डब्ल्यूपीएल 2024 लिलावात सोल्ड झालेली पहिली खेळाडू ठरली. तिने या लिलावात तिची बेस प्राईज 30 लाख रुपये ठेवली होती. तिला संघात घेण्यासाठीही अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेर फीबीवर विश्वास दाखवत गुजरात जायंट्सने 1 कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात घेतले. (Top 5 expensive players in WPL 2024 auction including 2 uncapped Indians)

हेही वाचा-
नाद करायचा नाय! WPL Auctionमध्ये 20 वर्षीय खेळाडूने केले 10 लाखांचे 2 कोटी, वाचा कुणी घेतलंय
कोण आहे ‘ही’ सलीमी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी

All-rounder Kashvee Gautam Annabel Sutherland Delhi Capitals Gujarat Giants Kashvee Gautam Kashvee Gautam WPL 2024 Kashvee Gautam WPL 2024 Auction Kashvee GautamNews Mumbai Indians Phoebe Litchfield Royal Challengers Bangalore Shabnim Ismail Top 5 expensive players in WPL 2024 auction UP Warriorz Vrinda Dinesh Women's Premier League 2024 Womens Premier League Womens Premier League Auction WPL 2024 WPL 2024 Auction WPL Auction 2024 अष्टपैलू काशवी गौतम एनाबेल सदरलँड काशवी गौतम काशवी गौतम डब्ल्यूपीएल 2024 काशवी गौतम डब्ल्यूपीएल 2024 लिलाव काशवी गौतम बातम्या गुजरात जायंट्स डब्ल्यूपीएल 2024 डब्ल्यूपीएल 2024 लिलाव डब्ल्यूपीएल 2024 लिलावातील 5 महागड्या खेळाडू डब्ल्यूपीएल लिलाव 2024 दिल्ली कॅपिटल्स फीबी लिचफील्ड महिला प्रीमिअर लीग महिला प्रीमिअर लीग 2024 महिला प्रीमिअर लीग लिलाव मुंबई इंडियन्स यूपी वॉरियर्झ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वृंदा दिनेश शबनीम इस्माइल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---