नाद करायचा नाय! WPL Auctionमध्ये 20 वर्षीय खेळाडूने केले 10 लाखांचे 2 कोटी, वाचा कुणी घेतलंय

WPL Auction: महिला प्रीमिअर लीग 2024 लिलावात अनकॅप्ड खेळाडू भल्याभल्या खेळाडूंवर भारी पडताना दिसत आहेत. शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत सुरू असलेल्या डब्ल्यूपीएल 2024 लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंवर फ्रँचायझींनी विश्वास दाखवला नाही, त्यामुळे त्यांना अनसोल्ड राहावे लागले. मात्र, अनेक संघांनी युवा अनकॅप्ड (राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या) खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना संघांचा भाग बनवले आहे. यामध्ये 20 वर्षीय काशवी गौतम हिच्या नावाचाही समावेश आहे.
मिळाली तब्बल 20 पट जास्त रक्कम
अष्टपैलू काशवी गौतम (Kashvee Gautam) हिने डब्ल्यूपीएल 2024 लिलावात (WPL 2024) आपली बेस प्राईज फक्त 10 लाख रुपये (Kashvee Gautam 10 Lakh Base Price) ठेवली होती. मात्र, तिला संघात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेर गुजरात जायंट्स संघाने 2 कोटी (Kashvee Gautam 2 Crore Rupees) रुपयांची मोठी बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील केले. अशाप्रकारे काशवी गौतम डब्ल्यूपीएल 2024 लिलावात (WPL 2024 Auction) 10 लाखांच्या बेस प्राईजपेक्षा 20 पट जास्त 2 कोटी रुपये घेत गुजरातमध्ये सामील झाली.
SOLD for INR 𝟮 𝗖𝗿𝗼𝗿𝗲! 💰
Kashvee Gautam will now play for the Gujarat Giants 👏👏#TATAWPLAuction | @TataCompanies
— Women's Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
काशवीविषयी थोडक्यात
काशवीची हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर तिला 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 23 वर्षांखालील स्पर्धेसाठी चंडीगड संघाची कर्णधार बनवण्यात आले आहे. संघाचा पहिला सामना बिहारविरुद्ध होणार आहे. तसेच, 11 डिसेंबर रोजी संघ दिल्लीशी भिडेल. त्यानंतर संघ 13 डिसेंबर रोजी गुजरात आणि 15 डिसेंबरला उत्तराखंडशी भिडेल.
काशवी तिच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. तिने वरिष्ठ महिला इंटर झोनल टी20 ट्रॉफीत हॅट्रिक घेण्याचाही पराक्रम गाजवला होता. तिने 5 विकेट्स घेऊन आपल्या नॉर्थ झोन संघाला नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध 111 धावांनी विजय मिळवून दिला होता. यानंतर तिला भारत अ संघात सामील केले गेले होते. (wow Indian Uncapped all rounder Kashvee Gautam sold to Gujarat Giants for 2 crores)
हेही वाचा-
कोण आहे ‘ही’ सलीमी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी
अंबानींच्या मुंबईला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सने जिंकली बोली! अष्टपैलूसाठी खर्च केले दोन कोटी रुपये