WPL 2024 Auction: महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा लिलाव मुंबईत शनिवारी (दि. 9 डिसेंबर) 3 वाजता सुरू झाला. या लिलावात अनेक खेळाडूंना बेस प्राईजपेक्षा दुप्पट, तिप्पट रक्कम मिळाली. तसेच, काही खेळाडूंना बेस प्राईजमध्येच संघांनी ताफ्यात घेतले, तर काही खेळाडूंवर कोणत्याही संघाने विश्वास दाखवला नाही. यादरम्यान इंग्लंडची स्टार खेळाडू बेस प्राईजमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ताफ्यात सामील झाली.
केट क्रॉस बेस प्राईजमध्ये आरसीबीच्या ताफ्यात
डब्ल्यूपीएल 2024 लिलावात (WPL Auction) केट क्रॉस (Kate Cross) हिच्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने विश्वास दाखवला. केटने डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) स्पर्धेच्या लिलावासाठी आपली बेस प्राईज 30 लाख रुपये ठेवली होती. मात्र, तिला आपल्या संघात घेण्यासाठी इतर फ्रँचायझींनी रस दाखवला नाही. मात्र, आरसीबी संघाने तिला 30 लाखांच्या ब्रेस प्राईजमध्ये ताफ्यात घेतले.
सीएसकेची चाहती, आरसीबीच्या ताफ्यात
खरं तर, केट क्रॉस ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची मोठी चाहती आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही सीएसके संघाच्या जर्सीतील फोटो शेअर केले आहेत. अशात आता सीएसकेची चाहती असलेली केट डब्ल्यूपीएल स्पर्धेत आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार आहे.
View this post on Instagram
CSK Fan @katecross16 is going to Play for RCB in WPL. pic.twitter.com/WetwbSUK9j
— CricketGully (@thecricketgully) December 9, 2023
केटची कारकीर्द
इंग्लंडची गोलंदाज केट क्रॉस ही 32 वर्षीय असून तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून 10 वर्षे लोटली आहेत. तिने यादरम्यान इंग्लंडकडून 7 कसोटी, 59 वनडे आणि 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने कसोटीत 24 विकेट्स, वनडेत 79 विकेट्स आणि टी20त 11 विकेट्स घेतल्या आहेत. (CSK Fan kate cross going to Play for RCB in WPL 2024)
हेही वाचा-
अंबानींच्या मुंबईला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सने जिंकली बोली! अष्टपैलूसाठी खर्च केले दोन कोटी रुपये
Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च