---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ‘डक’वर बाद झालेले भारतीय फलंदाज; या यादीत विराट कोहली कोणत्या क्रमांकावर?

On: शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025 10:23 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अॅडलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 2 विकेटने पराभव केला. या मालिकेतील सलग दोन्ही सामन्यात विराट कोहलीही शून्यावर बाद झाला आहे. एकदिवसीय सामन्यात 18 व्यांदा शून्यावर बाद होऊन विराटने एक अवांछित विक्रम रचला आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले टॉप-5 भारतीय फलंदाज कोण आहेत.

सचिन तेंडुलकर – 20 वेळा – भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या टॉप-5 भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 463 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तो 20 वेळा धावा न करता बाद झाला.

जवागल श्रीनाथ – 19 वेळा – एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीनाथ 229 एकदिवसीय सामन्यात 19 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

अनिल कुंबळे – 18 वेळा – भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 269 एकदिवसीय सामन्यात 18 वेळा कुंबळे एकही धाव न काढता बाद झाला.

युवराज सिंग – 18 वेळा – भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. युवराज ३०१ एकदिवसीय सामन्यात १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

विराट कोहली – 18 वेळा – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत 304 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 18 वेळा तो कोणत्याही धावा न करता बाद झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---