या वर्षी झालेल्या प्रो कबड्डी लिलावात महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनादेखील मोठी रक्कम मिळाली. गेले दोन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या या लिलावात दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या नीलेश सांळुखेला तब्बल ४९ लाख रुपये मिळाले. तेलगू टायटन्स संघाने या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. रेडर असणाऱ्या साळूंखेकडून या संघाला मोठ्या अपेक्षा असणार.
प्रो कबड्डीमध्ये २२ सामने खेळलेल्या निलेश साळूंखेने ५२ यशस्वी रेड, ३९ अयशस्वी तर ६८ एम्प्टी रेड मारल्या आहेत.
काशिलिंग आडके (यू मुम्बा), बाजीराव होडगे (दबंग दिल्ली), सचिन शिंगाडे (पाटणा पायरेटस), विशाल माने (पाटणा पायरेटस), निलेश शिंदे (दबंग दिल्ली), गिरीश इरनाक (पुणेरी पलटण) या महाराष्ट्रीयन खेळाडूंचा यावेळी लिलावात बोलबाला राहिला.
बाजीराव होडगे या ३५ वर्षीय बचावपटूवर दबंग दिल्ली संघाने विश्वास दाखवत तब्बल ४४.५० लाख रुपये मोजले आहेत. त्याने प्रो कबड्डीमध्ये ४३ सामन्यांत ८३ गुण मिळविले आहे.
परवा महाराष्ट्राच्याच काशिलिंग आडकेला यु मुम्बा संघाने ४८ लाख रुपयांची बोली लावून संघात घेतले होते.
महाराष्ट्रातील टॉप महागडे खेळाडू
निलेश साळुंखे (४९ लाख, तेलुगु टायटन्स)
काशिलिंग आडके (४८ लाख, यू मुम्बा)
रिशांक देवाडिगा (४५.५० लाख, उत्तर प्रदेश)
बाजीराव होडगे (४४.५० लाख, दबंग दिल्ली)
सचिन शिंगाडे (४२.५० लाख, पाटणा पायरेटस)
विशाल माने (३६.५० लाख, पाटणा पायरेटस)
निलेश शिंदे (३५ लाख, दबंग दिल्ली)
गिरीश इरनाक (३३.५० लाख, पुणेरी पलटण)
नितीन मदने (२८.५० लाख, यू मुम्बा)
तुषार पाटील (१५.२० लाख, जयपूर पिंक पँथर्स)
उमेश म्हात्रे (१५ लाख, पुणेरी पलटण)
विकास काळे (१२.६० लाख, गुजरात)
संकेत चव्हाण (१२ लाख, तामिळनाडू)
अक्षय जाधव (८ लाख, पुणेरी पलटण)
श्रीकांत जाधव (८ लाख, यू मुम्बा)
शशांक वानखेडे (८ लाख, बंगाल वॉरियर्स)
शुभम पालकर (६.१० लाख, दबंग दिल्ली)
सारंग देशमुख (६ लाख, तामिळनाडू)
मयूर शिवतरकर (६ लाख, हरयाणा)