---Advertisement---

भारताकडून वनडेत २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 2:03 PM
---Advertisement---

सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाने जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत अवघे 9 वनडे सामने खेळले. मात्र कमी सामने खेळूनही काही फलंदाज सातत्याने धावा फाटकावण्यात यशस्वी ठरले.

बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कॅनबेरा येथे झालेला वनडे मालिकेतील तिसरा सामना 2020 वर्षातील शेवटचा सामना ठरला आहे. त्यामुळे आता यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज निश्चित झाले आहेत. त्यातील पाच फलंदाजांबद्दल आपण जाणून घेऊ.

5)रवींद्र जडेजा

सन 2020 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अष्टपैलू रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी एकूण 9 वनडे सामने खेळले आहे. त्यापैकी 7 डावात त्याने 223 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 66 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावा त्याने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केल्या.

4)शिखर धवन

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने सन 2020 मध्ये एकूण 6 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 डावात 3 अर्धशतकाच्या मदतीने त्याने 290 धावा केल्या. 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यादरम्यान त्याची सरासरी 58 होती.

3)श्रेयस अय्यर

सन 2020 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने खेळलेल्या सर्व 9 सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 331 धावा केल्या. त्याची सरासरी 41.37 होती. न्यूझीलंड विरुद्ध केलेली 103 धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

2)विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सन 2020 मध्ये एकूण 9 डावात 47.88 च्या सरासरीने एकूण 431 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 89 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

1)केएल राहुल

या यादीत भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने सन 2020 मध्ये खेळलेल्या 9 डावात एक शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 443 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55.37 होती. न्यूझीलंड विरुद्ध केलेली 112 धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियामध्ये नवा रेकॉर्ड; ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

मागील ४ वर्षात या भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियामध्ये केले वनडे पदार्पण

विराटने १२ हजार धावांचा टप्पा तर पार केला, पण आता लक्ष सचिनच्या ‘या’ विक्रमावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---