इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) या हंगामात चौकार-षटकारांची भरपूर आतषबाजी पाहायला मिळाली. आयपीएलच्या इतिहासात शिखर धवननं सर्वाधिक चौकार मारले आहेत. तर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. आता या हंगामात सर्वाधिक चौकार-षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू कोणते, हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे 5 खेळाडू
1) ट्रॅव्हिस हेड (सनराईजर्स हैदराबाद): सामने – 15, धावा – 567, चौकार – 64, एका डावात सर्वाधिक चौकार – 11
2) विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): सामने – 15, धावा – 741, चौकार – 62, एका डावात सर्वाधिक चौकार – 12
3) ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज): सामने – 14, धावा – 583, चौकार – 58, एका डावात सर्वाधिक चौकार – 12
4) यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स): सामने – 16, धावा – 435, चौकार – 54, एका डावात सर्वाधिक चौकार – 9
5) सुनील नारायण (कोलकाता नाइट रायडर्स): सामने – 15, धावा – 488, चौकार – 50, एका डावात सर्वाधिक चौकार – 13
IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 खेळाडू
1) अभिषेक शर्मा (सनराईजर्स हैदराबाद): सामने – 16, धावा – 484, षटकार – 42, एका डावात सर्वाधिक षटकार – 7
2) विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): सामने – 15, धावा – 741, षटकार – 38, एका डावात सर्वाधिक षटकार – 6
3) हेनरिक क्लासेन (सनरायझर्स हैदराबाद): सामने – 16, धावा – 479, षटकार – 38, एका डावात सर्वाधिक षटकार – 8
4) निकोलस पूरन (लखनौ सुपरजायंट्स): सामने – 14, धावा – 499, षटकार – 36, एका डावात सर्वाधिक षटकार – 8
5) रियान पराग (राजस्थान रॉयल्स): सामने – 16, धावा – 573, षटकार – 33, एका डावात सर्वाधिक षटकार – 6
महत्त्वाच्या बातम्या –
पॅट कमिन्सनं सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “आम्ही चौकार-षटकार मारून…”
सुनील नारायण IPL 2024 चा सर्वात मौल्यवान खेळाडू! तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकून रचला इतिहास
सुनील नारायणची जादू अन् गौतम गंभीरचा गुरुमंत्र! ‘या’ 5 कारणांमुळे केकेआर 10 वर्षांनंतर बनली चॅम्पियन