---Advertisement---

टॉप-५ : आयपीएल लिलावाचे बादशहा, युवराजला पछाडत ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात महागडा

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 4:47 PM
---Advertisement---

चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा मिनी लिलाव पार पडला. या लिलावात तब्बल २९२ खेळाडू आपले नशीब आजमावू पाहत होते. यातील आत्तापर्यंत ग्लेन मॅक्सवेलला १० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. त्यानंतर ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या मांदियाळीत सामील झाला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे.

विशेष म्हणजे, मॉरिसने या किंमतीसह आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरलेल्या युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. माजी भारतीय अष्टपैलू युवराज याला दिल्ली डेअरडेविल्सने २०१५ साली सर्वाधिक १६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून आयपीएल २०२० पर्यंत तोच आयपीएलचा लिलावाचा राजा म्हणून ओळखला जात असायचा. मात्र आता मॉरिस त्याच्यापेक्षा अधिक रक्केमाचा आकडा गाठत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश
मॉरिस आणि युवराज यांच्यानंतर आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स (१५.५ कोटी, २०२०, केकेआर), बेन स्टोक्स (१४.२५ कोटी, २०१७, पुणे) यांचाही समावेश आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १४ कोटी २५ लाखांना ताफ्यात सहभागी केले आहे. यासह मॅक्सवेलही आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या टॉप-५ खेळाडूंमध्ये सहभागी झाला आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
ख्रिस मॉरिस- १६.२५ कोटी, २०२१ राजस्थान
युवराज सिंग- १६ कोटी, २०१५ दिल्ली
पॅट कमिन्स- १५.५ कोटी, २०२० कोलकाता
बेन स्टोक्स- १४.२५ कोटी, २०१७ पुणे
ग्लेन मॅक्सवेल- १४.२५ कोटी, २०२१ बेंगलोर

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल लिलाव : तब्बल ७ कोटींची बोली घेत चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू

ख्रिस माॅरिस ठरला आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू, या संघाने लावली १६.२५ कोटींची बोली

मार्केटमध्ये ‘मॅक्स’ भाऊचा दरारा कायम.! मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची विक्रमी बोली, ‘या’ संघाने घेतले ताफ्यात

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---