पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात शनिवारी(27 आॅक्टोबर) तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडीजने 43 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक करत चांगली लढत दिली होती.
त्याने या सामन्यात 119 चेंडूत 107 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील 38 वे आणि सलग तिसरे शतक होते. त्याने विंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यातही शतके केली आहेत.
याबरोबरच विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
विराटने पुण्यातील वनडेत केलेले हे खास विक्रम-
1. एकाच वनडे मालिकेत सर्वाधिक शतके करणारे कर्णधार-
3 – सौरव गांगुली (विश्वचषक 2003)
3 – एबी डिविलिएर्स (भारत विरुद्ध 2015/16)
3 – विराट कोहली (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018)
3 – विराट कोहली (विंडीज विरुद्ध 2018)
2. भारतात सलग चार शतके करणारे क्रिकेटपटू:
विराट कोहली (2017/18)*
एबी डिविलियर्स (2010/11)
3. विराट कोहली ठरला एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग चार डावांमध्ये शतक करणारा पहिलाच खेळाडू
4. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:
41 – रिकी पॉटींग
33 – विराट कोहली
33 – ग्रॅमी स्मिथ
20 – स्टीव्ह स्मिथ
5. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू:
18426 – सचिन तेंडुलकर
11363 – सौरव गांगुली
10889 – राहुल द्रविड
10183 – विराट कोहली
10150 – एमएस धोनी
6. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन शतके करणारा पहिला कर्णधार आणि वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन शतके करणारा विराट पहिलाच भारतीय क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या:
–असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो
–Video: खेळाडू परतले, पंच मात्र निर्णय देण्यासाठी भरपावसात मैदानातच