मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(10 मार्च) चौथा वनडे सामना सुरु आहे. या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली आहे.
तसेच शिखरने रोहित शर्मासह 193 धावांची सलामी भागीदारीही रचली आहे. रोहित 95 धावांवर बाद झाला. पण शिखरने त्याचा खेळ पुढेही चांगला चालू ठेवत वनडे क्रिकेटमधील त्याचे 16 वे शतक पूर्ण केले. त्याने हे शतक 97 चेंडूत पूर्ण केले.
पण 38 व्या षटकात शिखरला 143 धावांवर पॅट कमिन्सने त्रिफळाचीत करत बाद केले.
त्याचबरोबर शिखरने शतकी खेळी करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत, त्यातील काही निवडक विक्रम-
– वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय-
-49 – सचिन तेंडुलकर
41 – विराट कोहली
22 – सौरव गांगुली/रोहित शर्मा
16 – शिखर धवन
15 – विरेंद्र सेहवाग
-अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारे फलंदाज-
219 डाव – विराट कोहली
225 डाव – एबी डिविलियर्स
239 डाव – शिखर धवन
240 – जॅक रुडॉल्फ
-ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय सलामी जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी-
193 – रोहित शर्मा – शिखर धवन, मोहाली, 2019
178 – रोहित शर्मा- शिखर धवन, नागपूर, 2013
176 – रोहित शर्मा – शिखर धवन, जयपूर, 2013
175 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली, कानपूर, 1998
-वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांच्या जोड्या-
10 – सौरव गांगुली – सचिन तेंडुलकर
6 – हाशिम आमला – क्विंटन डिकॉक
6 – रोहित शर्मा – शिखर धवन
5 – हर्षेल गिब्स – ग्रॅमी स्मिथ
5 – गोर्डन ग्रिनीज – देसमंड हाइन्स
– 143 धावा ही शिखर धवनची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–हिटमॅन रोहित शर्माचे शतक हुकले पण हा मोठा विश्वविक्रम झाला नावावर!
–टीम इंडिया आणि एमएस धोनीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ही घटना