वनडेमध्ये २०० किंवा अधिक धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या मानली जाते. पण आजच्या काळात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या तरीही संघांना पराभवाला सामोरे जावे लागते. बर्याच वेळा संघ ३५० ची धावसंख्या देखील पार करतात.
पण वनडेमध्ये असे अनेकदा होते की संघ फक्त १०० च्या धावांपर्यंत कसेबसे पोहोचतात. ही धावसंख्या बनवल्यानंतर त्या संघाचा बऱ्याचदा पराभव निश्चित असतो.
या लेखात अशा ५ संघांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी सर्वाधिक वेळा वनडेमध्ये १०० पेक्षा कमी धावा केल्या. ही मोठी कामगिरी निश्चितच नाही. पण जेव्हा अशा वेळी संघातील सर्वच फलंदाज एकत्र अपयशी ठरतात तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते.
५. वेस्ट इंडिज संघ-
दोन वेळा विश्वविजेता आलेल्या वेस्ट इंडिज संघाचे नाव या यादीमध्ये आहे. वेस्ट इंडीज संघाने वनडे मध्ये एकूण ८२२ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या संघाने ८ वेळा १०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीज संघाने बरीच वर्ष क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. अशा संघाने अशी कामगिरी करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत त्यांचा संघ तितकी चांगली कामगिरी करत नाही, हेही मुख्य कारण आहे.
४. पाकिस्तान संघ-
पाकिस्तान, जो एकदा विश्वविजेता संघ होता, तो देखील या यादीमध्ये सामील आहे. एकेकाळी या वनडेमध्ये राज्य करणारा पाकिस्तान संघ एकूण ९२७ सामने खेळला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या संघाने ९ वेळा १०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत त्यांची चांगली कामगिरी करताना दिसत नाही.
३. श्रीलंका संघ-
या यादीत श्रीलंकेचा संघ तिसर्या क्रमांकावर आहे. या संघानेही एकदा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. त्यावेळी श्रीलंका संघ खूप बळकट असायची. जेव्हा एकेकाळी सामना जिंकून देणारे बरेच खेळाडू त्या संघात होते.
श्रीलंकेचा संघ वनडेमध्ये आतापर्यंत एकूण ८५२ सामने खेळला आहे. त्यापैकी त्याने ३८९ सामनेही जिंकले आहेत. गेल्या ४ वर्षात सर्व दिग्गज खेळाडू संघातून गेल्यानंतर त्याचा संघ चांगली कामगिरी करू शकलेला नाही. ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. श्रीलंकेच्या संघाने ११ वेळा १०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने सारखे खेळाडू होऊन गेलेल्या श्रीलंका संघात आता सामना जिंकून देणारा खेळाडू असल्याचे जाणवत नाही.
२. बांगलादेश संघ-
गेल्या काही दशकापासून एक चांगला संघ बनण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणार्या बांगलादेशचा संघही या यादीत समावेश आहे. या संघाने आपण जबरदस्त कामगिरी करू शकतो हे सिद्ध केले आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशच्या संघाने वरच्या संघांच्या यादीमध्ये स्वत: ला पुढे केले आहे. हे एक चांगले चिन्ह असल्याचे म्हटले जाते.
बांगलादेश संघाने भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सारख्या संघांविरुद्ध मालिका जिंकल्या आहेत. विश्वचषकासारख्या स्पर्धेत त्यांनी इंग्लंड संघालाही पराभूत केले आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. यावर सिद्ध होते कि बांगलादेश संघ सातत्यपूर्ण कामगिरी करून वरचढ होत आहे.
आतापर्यंत त्यांनी ३७६ वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या संघाने १६ सामन्यांत १०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
१. झिम्बाब्वे संघ-
जेव्हा या संघाने क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा लवकरच या संघातून अधिक चांगले खेळाडू बघायला मिळतील असे वाटले होते, परंतु आजपर्यंत तसे झाले नाही. ज्यामुळे हा संघ या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. झिम्बाब्वे संघाने आतापर्यंत ५२९ वनडे सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.
झिम्बाब्वेच्या संघाने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यांचा संघ १७ वेळा १०० पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.
आजच्या काळात या संघाबद्दल कोणतीही चर्चा होत नाही. त्याचे कारण म्हणजे झिम्बाब्वेचा संघ सध्या उच्च स्तरावर खेळताना दिसत नाही. मोठ्या खेळाडूंच्या कमतरतेमुळे नेहमीच हा संघ अडचणीत सापडला.