आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. याआधी, या हंगामाचे २९ सामने भारतात खेळले गेले होते, जिथे कोविड-१९ साथीच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा ४ मे रोजी मध्येच स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा चाहत्यांना या स्पर्धेचा पूर्ण आस्वाद घेता येणार आहे, ज्यात त्यांना सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पाहायला मिळतील. आयपीएल २०२१ च्या उर्वरित ३१ सामन्यांमध्ये, कोणता फलंदाज आता शतक झळकावतो, हे पाहण्यासारखे असेल. या स्पर्धेत कोणत्या सहा फलंदाजांनी आतापर्यंत सर्वात जलद शतक झळकावण्यात यश मिळवले आहे, याची माहिती घेऊया.
ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलचे सर्वात वेगवान शतक
आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने ६६ चेंडूत १७५ धावा केल्या ज्यामध्ये त्याने १७ षटकार आणि १३ चौकार मारले होते. या खेळीदरम्यान त्याने ३० चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.
त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत युसुफ पठाण दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. युसूफ पठाण त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
त्या सामन्यात राजस्थान संघाला २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला होता. नंतर युसूफ शतक झळकावून बाद झाला आणि राजस्थान संघाने ७ गडी गमावत २०८ धावा केल्या होत्या आणि त्यांचा ४ धावांनी पराभव झाला होता. युसूफ या यादीत पहिल्या ५ फलंदाजांमध्ये एकमेव भारतीय फलंदाज आहे.
आयपीएलमधील तिसरे सर्वात जलद शतक २०१३ मध्ये डेविड मिलरने आरसीबीविरुद्ध ३८ चेंडूत केले होते.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे सहा फलंदाज-
३० चेंडू – ख्रिस गेल वि. पीडब्ल्यू- २०१३
३७ चेंडू – युसूफ पठाण वि. एमआय- २०१९
३८ चेंडू – डेविड मिलर वि. आरसीबी – २०१३
४२ चेंडू – ऍडम गिलख्रिस्ट वि. एमआय – २००८
४३ चेंडू – एबी डिव्हिलियर्स वि. जीएल – २०१६
४३ चेंडू – डेविड वॉर्नर वि. केकेआर – २०१७
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक जिंकणारे ३ कर्णधार, ज्यांना आयपीएलमध्ये एकदाही नाही मिळाली कॅप्टन्सी
नेपाळच्या गोलंदाजापुढे विरोधी संघाची फलंदाजी फळी खिळखिळी, ५.१ षटकात काढल्या ६ विकेट्स